Team India : ‘टी-20 मध्ये हार्दिकच कर्णधारपदाचा योग्य दावेदार, पण गंभीरने…’; मोहम्मद कैफ चांगलाच भडकला
Mohammed Kaif on Gautam Gambhir : टीम इंडियाच्या कर्णधारपदी मोठा बदल झालेला पाहायला मिळाला. गौतम गंभीर याने सूर्यकुमार यादवला कर्णधार केलं, मात्र हा पंड्याला डावलल्याने मोहम्मद कैफने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडियाने T-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता सर्व समीकरणे बदलली आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपल्यावर बीसीसीआयने माजी खेळाडू गौतम गंभीर याची कोचपदी नियुक्ती केली होती. गौतम गंभीर याने कोच झाल्यावर आता टी-20 फॉरमॅटमधील टीम इंडियाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादव याची वर्णी लावली. मात्र सूर्यकुमार यादवपेक्षा हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतु तसे काही झाले नाही. हार्दिकला कर्णधारपद न दिल्याने भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ हा गौतम गंभीरवर भडकल्याचं दिसत आहे.
मला वाटतं की पंड्याने एक कर्णधार म्हणून काही चुकीचं केलेलं नाही. हार्दिकला कर्णधापदाचा चांगला अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्येही गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली आहे. महत्त्वाचं म्हणजे युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंना सोबत घेत विजेता केलं. त्यामुळे मला वाटतं की तो कर्णधारपदाचा योग्य दावेदार होता, असं मोहम्मद कैफ याने म्हटलं आहे.
आता नवीन कोच झाल्याने त्यांच्या काही वेगळ्या योजना असतील. सूर्या हा चांगला खेळाडू असून गेली अनेक वर्षे तो भारताकडून खेळत आहे. टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 चा खेळाडू आहे त्यामुळे मला आशा आहे की तो जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. पण मला वाटतं की हार्दिकडे जबाबदारी द्यायला हवी होती. गंभीर एक अनुभवी कर्णधार आणि कोच असल्याने त्याला क्रिकेट हे चांगलं समजत असल्याचं कैफ म्हणाला.
टी 20 सीरिज : पहिला सामना, 27 जुलै दुसरा सामना, 28 जुलै तिसरा सामना, 30 जुलै एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक : पहिला सामना, 2 ऑगस्ट, दुसरा सामना, 4 ऑगस्ट, तिसरा सामना, 7 ऑगस्ट
दरम्यान, श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. यामध्ये टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलीये. तर रोहित आणि विराट हे श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. आधी दोघे विश्रांती घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटने फक्त जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली आहे.