Mohammed Shami : 0 W 0, 0, 0, W, 0, 0, 0, 0 0 W, 0, 0, 0, खतरनाक बॉलिंग, मोहम्मद शमी याच्या 15 चेंडूंपुढे कांगारू चीत
पठ्ठ्याच्या या घातक स्पेलची जगभरातील क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. स्पेल दरम्यान शमीने शेवटचे 14 चेंडू अशा प्रकारे टाकले की फलंदाज एकही धाव काढू शकला नाही.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्याच एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी जलवा दाखवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यानेतर खतरनाक बॉलिंग स्पेल टाकला आणि 3 बळी घेतले. शमीच्या या स्पेलपुढे कांगारू चीत झालेले दिसून आले. पठ्ठ्याच्या या घातक स्पेलची जगभरातील क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. स्पेल दरम्यान शमीने शेवटचे 14 चेंडू अशा प्रकारे टाकले की त्यावर फलंदाज एकही धाव काढू शकले नाही.
मोहम्मद शमीच्या 3 ओव्हर, ज्यामुळे सामना फिरला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यातील 28 वी ओव्हर 0 2 6 0 W 0 आणि 8 धावा, 30 व्या ओव्हरमध्ये 0 0 W 0 0 0 एकही धाव नाही आणि 1 विकेट अशाच प्रकारे 0 0 W 0 0 0 32व्या षटकातही एकही धाव नाही आणि 1 विकेट यातील शेवटच्या 15 चेंडूत त्याने एकही धाव न देता 3 विकेट घेत विक्रम केला आहे.
What a spell by Mohammed Shami. His bowling figure (6-2-17-3) and his last 14 balls, he picked 3 wickets and without given a single runs. Brilliant Mohammed Shami. pic.twitter.com/FJyFUZW5LC
— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 17, 2023
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 35.4 षटकात 188 धावांत गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शने सर्वाधिक 81 धावा केल्या.
दरम्यान, चौथ्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कांगारुंनी शेवटच्या 6 विकेट्स या 49 धावांच्या मोबदल्यात तर शेवटच्या 4 विकेट्स या 4 धावांच्या आतच गमावल्या. शमी आणि सिराज या दोघांव्यतिरिक्त रविंद्र जडेजा याने 2, कुलदीप यादव याने 1 आणि कॅप्टन हार्दिक याने 1 विकेट घेतली.
पहिल्या वनडेसाठी दोन्ही संघ टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी और मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवहन स्मिथ (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस, कॅमरुन ग्रीन,ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, सीन एबॉट, मिचेल स्टार्क आणि एडम जम्पा.