IPL 2024 | मोहम्मद शमी 17 व्या हंगामातून ‘आऊट’! टीम इंडियालाही टेन्शन

Mohammed Shami Ipl 2024 | आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी गुजरात टायटन्सला मोठा झटका लागला आहे. मोहम्मद शमी हा आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

IPL 2024 | मोहम्मद शमी 17 व्या हंगामातून 'आऊट'! टीम इंडियालाही टेन्शन
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 3:47 PM

मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला अवघे काही दिवस बाकी आहेत. या 17 व्या मोसमासाठीचं वेळापत्रक हे 22 फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी एक मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियासाठी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सला मोठा झटका लागला आहे. तसेच टीम इंडियाचंही टेन्शन वाढलं आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्यामाहितीनुसार, मोहम्मद शमीला डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. तसेच शमी घोट्यावर लवकरच शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी शमी ब्रिटेनला जाणार असल्याचंही म्हटलं आहे.

मोहम्मद शमीला वर्ल्ड कप 2023 दरम्यान ही दुखापत झाली होती. शमी तेव्हापासून क्रिकेटपासून दूर आहे. शमीला या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संधी देण्यात आली नाही. तर सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर आता तो थेट आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे शमी लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा परतावा, अशी अपेक्षा गुजरात टायटन्सह टीम इंडियाच्या चाहत्यांना असणार आहे. कारण आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

संध्याकाळी 5 वाजता घोषणा

दरम्यान आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं वेळापत्रक आज 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या वेळापत्रकाचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमुळे या स्पर्धेचं वेळापत्रक हे 2 टप्प्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. आता आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल कशाप्रकारे या 17 व्या मोसमाची घडी बसवते, याकडेही लक्ष असणार आहे.

मोहम्मद शमी आयपीएलच्या 17 व्या मोसमाला मुकणार!

आयपीएलच्या 17 व्या मोसमाठी गुजरात टायटन्स टीम | शुबमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, ऋद्धीमान साहा, केन विलियमसन, डेव्हीड मिलर, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नलकांडे, उमेश यादव, अजमतुल्लाह उमरझई, विजय शंकर, जयंत यादव, शाहरुख खान, राहुल तेवतिया, मानव सुथार, रॉबिन मिंज, मोहम्मद शमी, नूर अहमद, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, स्पेंसर जॉनसन, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, साई किशोर आणि राशिद खान.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.