Mohammed Shami : ‘…मग भारतातच का राहायचं?’, मोहम्मद शमी प्रचंड वैतागला; धक्कादायक विधानामागचं कारण काय?
Mohammed Shami Sajda : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. शमीने मैदानावर सजदा करण्याचा प्रयत्न केला असा वाद सुरू आहे. मात्र यावर बोलताना शमीने आक्रमक भूमिका घेत थेट देश सोडण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्ये गड्याला संधी मिळाली नाही. पण जेव्हा संघात त्याला स्थान मिळालं तेव्हा पठ्ठ्याने केलेल्या बॉलिंगने सर्वांनाच भुरळ पाडली होती. त्यामुळे पुढील सामन्यामध्ये त्याला खेळवायचं नाही हा प्रश्नच टीम मॅनेजनमेंटला पडला नाही. मोहम्मद शमीनेही नाराजन न करता टीम इंडियाच्या प्रत्येक विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीला चाहते ट्रोल करू लागले आहेत. शमीने वर्ल्ड कर दरम्यान मैदानाता सजदा (मैदानात जमिनीवर डोकं ठेवून नमस्कार) करायचा असल्याचं त्याचं म्हणणं आहे. या वादावर बोलताना शमी थेट म्हटलं आहे की मी भारतात का राहायचं मग?, अस सवाल केला आहे. शमीने वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेविरूद्धच्या साखळी सामन्यामध्ये विकेट घेतल्यावर गुडघ्यावर बसला होता. याचाच धागा पकडत काही ट्रोलर्सनी त्याला सजदा करायचा होता असं म्हटलं आहे. यावर शमीने मौन सोडलं आहे.
काय म्हणाला मोहम्मद शमी?
मी धर्माच्या बाबतीत कोणालाच रोखलेलं नाही. तर तुम्हीसुद्धा मला माझ्या धर्मापासून रोखू शकणार नाही. जर मला सजदा करायचा असेल तर मी करेल ना? कोणाला त्रास होतोय? हो मी मुस्लिम आहे हे अभिमानाने सांगतो आणि मला भारतीय असल्याचाही अभिमान आहे. जर मला सजदा करण्यासाठी कोणची परवानगी घ्यायची असेल तर मी भारतात का राहू?, असा सवाल मोहम्मद शमीने केला आहे.
सोशल मीडियावर अनेक गोष्टी पाहिल्या की मला सजदा करायचा होता पण केला नाही. अरे पण मी याच्याआधीसुद्धा पाच विकेट घेतल्या आहेत. ज्या दिवशी मला पाच विकेट घ्यायच्या आहेत त्या दिवशी मी करेल, तेव्हा फक्त कोणी प्रश्न उपस्थित करून दाखवावा, असं आक्रमकपणे मोहम्मद शमी म्हणाला. शमी इतकंच नाहीतर यावरून त्याने ट्रोल करण्यारांनाही सुनावलं आहे.
दरम्यान, मला कसा आणि कुठे त्रास होईल याचाच हे ट्रोल करणारे लोक विचार करत असतात. ना ते माझे आहेत ना तुमचे . त्यांना फक्त गॉसिपिंग आवडते, खरं म्हणजे त्या मॅचमध्ये मी संपूर्ण ताकदीने गोलंदाजी करत होतो. फलंदाज बीट होत होते पण विकेट मिळत नव्हती त्यामुळे मी पण थकून गेलो होतो. जेव्हा मला पाचवी विकेट मिळाली तेव्हा मी गुडघ्यावर बसलो. त्यावेळी समोरच्या बाजूल थोडासा वाकलो तर काहींनी पाठीमागून फोटो घेऊन त्याचे मीम्स बनवले. अशा लोकांना बाकी काही काम नाही वाटतं, असं म्हणत शमीने ट्रोलर्सला फटकारलं.