IND vs ENG, Mohammed Shami : मोहम्मद शमीनं अगरकर, झहीर खानला टाकलं मागे, वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला शमी

जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचं तर मिचेल स्टार्कच्या नावावर सर्वात जलद 150 एकदिवसीय विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 77 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे, तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सकलेन मुश्ताक (78) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IND vs ENG, Mohammed Shami : मोहम्मद शमीनं अगरकर, झहीर खानला टाकलं मागे, वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला शमी
मोहम्मद शमीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 6:48 AM

नवी दिल्ली :  भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन बळी घेत 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 150 विकेट घेतल्या. शमी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अजित आगरकर (Ajit Agarkar), झहीर खान (Zaheer Khan) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना त्याने मात दिली आहे. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध 110 धावांत गारद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा रोहित शर्माचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरविला. यादरम्यान जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं 30 धावा केल्या.

वृत्तसंस्थेचं ट्विट

यापूर्वी कुणाच्या नावावर विक्रम?

शमीआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय अजित आगरकर होता. त्यानं 97 सामने खेळून हा विक्रम केला होता. तर झहीर खानने 103 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, मोहम्मद शमीने 80 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे.

जागितक क्रिकेटमध्ये कुणाच्या नावावर विक्रम?

जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचं तर मिचेल स्टार्कच्या नावावर सर्वात जलद 150 एकदिवसीय विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 77 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे, तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सकलेन मुश्ताक (78) दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमीने राशिद खानची बरोबरी करत तिसऱ्या क्रमांकावर आपले नाव नोंदवले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 एकदिवसीय विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज

  1. 77 मिचेल स्टार्क
  2. 78 सकलेन मुश्ताक
  3. 80 रशीद खान / मोहम्मद शमी
  4. 81 ट्रेंट बोल्ट
  5. 82 ब्रेट ली

कमी चेंडूत 150 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कने हा टप्पा गाठण्यासाठी 3917 चेंडू घेतले. तर अजंता मेंडिसने 4053 चेंडूत हा विक्रम केला. शमीने 4071 चेंडूत 150वी विकेट घेतली.

हेही वाचा…

  1. 150 विकेट घेणारा भारतीय अजित आगरकर होता.
  2. त्यानं 97 सामने खेळून हा विक्रम केला होता.
  3. झहीर खानने 103 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या होत्या
  4. मोहम्मद शमीने 80 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे.

एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध 110 धावांत गारद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा रोहित शर्माचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरविला. यादरम्यान जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं 30 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.