Good News : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार मोहम्मद शमी! फक्त इतकं काम केलं की झालं
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेसाठी एक तगडा गोलंदाज संघात असणं आवश्यक आहे. असं असताना टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघात सहभागी होऊ शकतो.नुकतीच मोहम्मद शमीने रणजी ट्रॉफीत पुनरागमन केलं आहे. तसेच चार विकेटही घेतल्या आहेत.
भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खूपच महत्त्वाची आहे. भारताने या मालिकेसाठी 18 खेळाडूंची निवड केली आहे. पण या संघात अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचं नाव नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळल्यानंतर मोहम्मद शमी क्रिकेट मैदानापासून दूर होता. दुखापत आणि त्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मोहम्मद शमी गेल्या एक वर्षापासून क्रिकेट सामने खेळलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही अशी चर्चा रंगली होती. पण निवडीवेळी मोहम्मद शमी फिट नसल्याचं पाहून त्याला डावलण्यात आलं होतं. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच मोहम्मद शमीने कमाल केली आहे. रणजी स्पर्धेतून मोहम्मद शमीने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केलं आहे. मोहम्मद शमीने मध्य प्रदेशविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या नावाच विचार होऊ शकतो. कारण मोहम्मद शमीने फिट अँड फाईन असल्याचे संकेत दिले आहेत. मध्य प्रदेशच्या पहिल्या डावात त्याने चार स्पेल टाकले. त्याने टाकलेल्या 19 षटकात चार निर्धाव षटकं आणि 4 विकेट घेतल्या.
सध्या टीम इंडिया अडचणीत आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर टीकेचा भडिमार होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणितही चुकलं आहे. असं असताना मोहम्मद शमीची आवश्यकता टीम इंडियाला आहे. यापूर्वी मोहम्मद शमीची दुसऱ्या लिटमस टेस्ट होणार आहे. कारण दुसऱ्या डावात मोहम्मद शमी कशी गोलंदाजी करतो याकडे निवड समितीचं लक्ष असणार आहे. तर त्याने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली आणि पायाला काहीच दुखापत नसेल तर त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होऊ शकते. मोहम्मद शमीची निवड डे नाईट कसोटी सामन्यापूर्वी होऊ शकते. रणजी स्पर्धेतील हा सामना 16 नोव्हेंबरला संपणार आहे. तर टीम इंडिया आपला पहिला सामना 22 नोव्हेंबरला खेळणार आहे. जर मोहम्मद शमीची निवड झाली तर पीएम 11 विरुद्ध दोन दिवसीय डे नाईट सराव सामना खेळण्याची संधी मिळेल.
बीसीसीआयच्या सूत्रानुसार, ‘शमीला रणजी सामना खेळण्यास सांगितलं होतं. कारण की रणजी स्पर्धेचा दुसरा टप्पा 23 जानेवारीनंतर सुरु होत आहे. त्यामुळे त्याची फिटनेस टेस्ट घेण्यासाठी एकच सामनाहोता. त्याने 19 षटकं टाकली तसेच 57 षटकं फिल्डिंग केली.त्यात त्याने 90 चेंडू डॉट टाकले आहे. पण त्याला दुसऱ्या डावात गोलंदाजी आणि फिल्डिंग करावी लागेल. जर त्याने त्यात यश मिळवलं तर चार दिवस त्याच्या दुखापतीकडे लक्ष ठेवणार. जर एनसीएने हिरवा कंदील दाखवला तर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सहभागी करणार.’