T20 World Cup 2022 स्पर्धेआधी मोहम्मद शमीची अग्निपरीक्षा, 2 महिन्यात रिझल्ट्स न दिल्यास टीम इंडियातून बाहेर
मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे गोलंदाजी कौशल्य उत्कृष्ट आहे. ज्या प्रकारचा स्विंग आणि सीम तो साधतो, कदाचित जगातील कोणत्याही गोलंदाजाकडे हे कौशल्य नसेल.
मुंबई : मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे गोलंदाजी कौशल्य उत्कृष्ट आहे. ज्या प्रकारचा स्विंग आणि सीम तो साधतो, कदाचित जगातील कोणत्याही गोलंदाजाकडे हे कौशल्य नसेल. तथापि, असे असूनही मोहम्मद शमी 2022 च्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. खरं तर, मोहम्मद शमीचा आता कसोटी विशेषज्ञ गोलंदाज म्हणून विचार केला जात आहे आणि T20-ODI क्रिकेटमधील इतर अनेक पर्यायांमुळे त्याला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळणे, संधी मिळवणे कठीण जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी टीम इंडियाची (Team India) प्राथमिकता नाही. T20 विश्वचषक 2021 नंतर टीम इंडियाने शमीची वनडे आणि टी-20 फॉरमॅट संघात निवड केली नाही आणि शमीला तो त्यांचा टेस्ट स्पेशालिस्ट गोलंदाज असल्याचे सांगण्यात येत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जर मोहम्मद शमीला टी-20 विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी दिली जाऊ शकत नाही. जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे जो प्रत्येक फॉरमॅटमध्ये फिट बसतो. हे संघ व्यवस्थापन खेळाडूंना स्पष्टपणे सांगते आणि शमीलाही हे सांगितले असावे.
आयपीएल 2022 ही मोहम्मद शमीसाठी शेवटची संधी!
मोहम्मद शमीने गेल्या 9 वर्षात केवळ 17 टी-20 सामने खेळले आहेत आणि या काळात त्याचा इकॉनॉमी रेट प्रति षटक 9.54 धावा इतका आहे. आयपीएलमध्येही तो खूप महागडा गोलंदाज ठरला आहे, त्यामुळे टी-20 क्रिकेटमध्ये तो भारताची पहिली पसंती नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आयपीएल 2022 त्याच्यासाठी परीक्षेसारखं असेल. आयपीएलमधील चांगली कामगिरी त्याला टी-20 विश्वचषकात स्थान मिळवून देऊ शकेल.
टीम इंडियाच्या गरजा शमीपेक्षा वेगळ्या!
खरं तर, टीम इंडियाला टी-20 फॉरमॅटमध्ये असे खेळाडू हवे आहेत जे गोलंदाजीसोबतच फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही योगदान देऊ शकतील. शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांच्या आगमनाने ही गोष्ट आणखी मजबूत झाली आहे. याशिवाय संघात बुमराह, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णासारखे वेगवान गोलंदाज आहेत. गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई हे देखील संघाचा भाग आहेत. हे गोलंदाज T20 आणि ODI फॉरमॅटचे स्पेशालिस्ट मानले जातात आणि त्यांनी स्वतःला सिद्धही केले आहे. याशिवाय हार्दिक पंड्या आणि व्यंकटेश अय्यर हे देखील असे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी करण्याची ताकद आहे. या दोन्ही खेळाडूंसाठी आयपीएल 2022 ही मोठी कसोटी असेल तसेच निवडकर्त्यांची नजर राहुल चाहरवरदेखील असेल.
इतर बातम्या
IPL 2022: राष्ट्रनिष्ठा की, IPL, अखेर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दिलं उत्तर
IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
IPL 2022: पहिल्याच नेट सेशनमध्ये Mumbai Indians च्या टीम डेविडची दे, दणादण बॅटिंग, पहा VIDEO