RCB vs MI : मोहम्मद सिराज याने टाकली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर, इतके बॉल टाकावे लागले!

सामना जिंकला असला तर स्टार गोलंदाज मोहम्मजद सिराजने आपल्या नावावर नकोसा विक्रम केला आहे. सिराजने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर टाकली आहे.

RCB vs MI : मोहम्मद सिराज याने टाकली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर, इतके बॉल टाकावे लागले!
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 1:46 AM

मुंबई : आयपीएलमध्ये अजून आरसीबीने एकदाही विजेतेपदावर नाव न कोरलं नसलं नाही. मात्र यंदा आरसीबी संघ विजेतेपद जिंकायचंच असल्याचं ठरवून आल्याचं दिसत आहे. पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडिअन्स संघाला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं आहे. आधी गोलंदाज त्यानंतर फलंदाजांनी केलेल्या चमकादार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने हा विजय मिळवलाय. सामना जिंकला असला तर स्टार गोलंदाज मोहम्मजद सिराजने आपल्या नावावर नकोसा विक्रम केला आहे. सिराजने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ओव्हर टाकली आहे.

मोहम्मद सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दोन धावा दिल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये एक धाव आणि एक विकेट घेतली. तिसऱ्या ओव्हरमध्येही त्याने जास्त नाहीतर अवघ्या दोन धावा दिल्या होत्या. इतका खतरनाक स्पेल गेल्यावर कोणीही विचार केला नव्हता की तो चौखी ओव्हर इतकी खराब टाकेल. फॅफ ने 19 वी ओव्हर त्याच्याकडे दिली.

या ओव्हरमध्ये सिराजने पहिल्या दोन चेंडूंवर 1 धाव दिली मात्र त्यानंतर सिराजला आपला तिसरा बॉल टाकण्यासाठी त्याला पाच बॉल टाकावे लागले. यामध्ये त्याने चार वाईड बॉल टाकले तिसऱ्या बॉलवर दोन धावा तर चौथ्य चेंडूवर तिलक वर्माने त्याला चौकार मारला. पाचव्याही चेंडूवर चौकार आणि शेवटचा बॉल डॉट टाकत त्याने ओव्हर संपवली. या ओव्हरमध्ये एकूण त्याने 16 धावा दिल्या आणि पाच वाईड बॉल टाकले.

दरम्यान, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा केल्या होत्या. आरसीबीने हे लक्ष्य 8 विकेट्स आणि 22 बॉल राखून पूर्ण केलं.  आरसीबीकडून विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस यांनी 148 धावांची सलामी दिली. मुंबईला सामन्यामध्ये येऊ देण्याची एकही संधी दिली नाही. फॅफ 73 धावा करून बाद झाला. विराट कोहली  82 धावा करून नाबाद राहिला. त्यानंतर आलेला कार्तिक पहिल्याच बॉलवर बाद झाला, मॅक्सवेलने दोन षटकार मारत सामना जिंकून दिला.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन | फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एम ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), एस अहमद, एच पटेल, आर टोपली, मोहम्मद सिराज, के शर्मा आणि ए दीप.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर आणि अर्शद खान.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.