IPl 2023 मधून बाहेर पडला होता पण तो आलाच, ‘या’ संघाची ताकद आणखी वाढली!
दिग्गज खेळाडू आयपीएलबाहेर गेल्याने चाहते नाराजआ आहेत. मात्र अशातच स्टार बॉलरने पुन्हा एकदा संघामध्ये कमबॅक केलं आहे.
मुंबई : आयपीएल 2023 ला दुखापतींचे ग्रहण लागलेलं आहे. कारण यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झालेले आहेत. स्पर्धेमध्ये अनेक स्टार खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात. मात्र दुखापतींमुळे सर्व संघातील काही खेळाडूंना बाहेर बसावं लागलं आहे. भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह, इंग्लंडचा बॉलर जोफ्रा आर्चर, त्यासोबतच आणखी मोठे खेळाडू आहेत जे दुखापतींचा सामना करत आहेत.
या दुखापतींचा फटका सर्व संघांना बसलेला दिसत आहे, तर याची दुसरी बाजू म्हणजे या खेळाडूंच्या दुखापतीमुळे युवा खेळाडूंना संधी मिळत दिसत आहे. मात्र हे दिग्गज खेळाडू आयपीएलबाहेर गेल्याने चाहते नाराज आहेत. मात्र अशातच स्टार बॉलरने पुन्हा एकदा संघामध्ये कमबॅक केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून मोहसीन खान आहे.
मोहसीन खान संघात परतल्याने लखनऊ सुपर जायंट्स संघाची ताकद आणखी वाढली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे मोहसीन आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला होता. याआधी असा अंदाज वर्तवला जात होता की वेगवान गोलंदाज मोहसीन खान आयपीएल 2023 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर जाऊ शकतो. मात्र तो पुन्हा एकदा संघात परतला आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने आयपीएल 2022 मध्ये नऊ सामन्यांत 14 बळी घेतले आहेत. आयपीएल 2022 मध्ये मोहसीनने लखनऊसाठी दमदार गोलंदाजी केली. कर्णधार केएल राहुलला शेवटच्या सामन्यात रवी बिश्नोईकडे शेवटची ओव्हर द्यावी लागली होती. डेथ ओव्हर्समध्ये मोहसीन खानने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याच्या येण्याने संघांची गोलंदाजी आणखी मजबूत होणार आहे.
दरम्यान, राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मोहसीनला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आलं नाही. नवीन उल हक आज लखनऊ संघाकडून पदार्पण करत आहे. नवीन उल हक हा अफगाणिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज आहे.