Video : थालाच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, फक्त एक मागणी आणि महेंद्रसिंह धोनी केलं हवं तसं
महेंद्रसिंह धोनी चाहत्यांमध्ये थाला या नावाने प्रसिद्ध आहे. चेन्नई सुपर किंग्स प्रतिनिधित्व करताना महेंद्रसिंह धोनीला हे नाव त्याच्या चाहत्यांनी दिलं होतं. धोनीला इतकं प्रेम उगाचच मिळालं नाही तर त्यासाठी त्याचा स्वभावही कारणीभूत आहे.
मुंबई : महेंद्रसिंह धोनी हे भारतीय क्रिकेट विश्वातलं मोठं नाव आहे. कारण त्याच्या नेतृत्वात भारताने वनडे, टी 20 आणि चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. त्याची कारकिर्द कायमच क्रीडा रसिकांच्या स्मरणात राहणारी आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाच जेतेपदांवर नाव कोरलं आहे. महेंद्रसिंह धोनी यांने वयाच्या 42 व्या वर्षी आयपीएलमधील जेतेपद पटकावून दाखवलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कायम दिसून आली आहे. दुसरीकडे, महेंद्रसिंह धोनी त्याच्या चाहत्यांना तितक्याच दिलखुलासपणे दाद देतो. असाच काहीसा प्रकार धोनीचं होम टाऊन रांचीमध्ये घडला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
चाहत्याने महेंद्रसिंह धोनीला केली होती अशी विनंती
महेंद्रसिंह धोनी याने नेमकं काय केलं याची उत्सुकता तुम्हाला असेल, तर वेळ न घालवता तुम्हाला सांगतो. महेंद्रसिंह धोनीसोबत एक चाहता फोटो काढत होता. त्यावेळी चाहत्याने महेंद्रसिंह धोनीकडे एका पोझची मागणी केली. त्याची मागणी पाहून धोनीने त्याला जराही नाराज केलं नाही. त्याला हवी तशी पोझ दिली आणि फोटो काढला. यामुळे चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इतकंच काय तर शेवटी ऑटोग्राफही दिली.
View this post on Instagram
क्रिकेटमध्ये तसं पाहिलं तर चाहत्याने सांगितलेली पोझ श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा करतो. विकेट घेतल्यानंतर त्याची ही सिग्नेचर पोझ आहे. तसेच फुटबॉल मैदानात गोल केल्यावर नेमार असंच काहीसं करतो.
धोनीचा कृतीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सीएसके फॅन ऑफिशल नावाच्या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या व्हिडीओखाली चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
आयपीएल 2024 स्पर्धेत धोनी खेळणार की नाही?
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आता धोनी 2024 मध्ये आयपीएल खेळणार की नाही याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. आयपीएल 2023 स्पर्धेत धोनीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जात होतं. मात्र महेंद्रसिंह धोनीने याबाबत अजूनही काहीही बोललेलं नाही. त्यात रवींद्र जडेजाने बर्थडे विश करताना पुढच्या हंगामात खेळताना पाहायचं आहे असं सांगितलं आहे.