IPL 2023 : सीझन सुरू होताना धोनीकडे 15 बॅट्स, संपताना फक्त तीनच… अखेर माहीची ती गोष्ट आली समोर!
धोनी सीझनमध्ये खेळायला येताना 15 बॅट आणतो मात्र सीझन संपेपर्यंत त्याच्याकडे फक्त 4 बॅट राहतात नेमकं कसं काय? धोनी इतक्या बॅटचं करतो तरी काय? जाणून घ्या.
मुंबई : महेंद्रसिंह धोनीला आयपीएलमध्ये मैदानावर फक्त पाहणं हेसुद्धा खूप आहे. दिग्गज खेळाडूने तशी कामगिरीच केली आहे. काहीजण तो खेळत आहे म्हणून आयपीएल पाहतात. धोनी मैदानावर बॅटींगला येण्याआधी चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळतो. धोनीविषयीची प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असावी असं सर्वांना वाटतं. अशातच धोनी सीझनमध्ये खेळायला येताना 15 बॅट आणतो मात्र सीझन संपेपर्यंत त्याच्याकडे फक्त 4 बॅट राहतात.
धोनी बॅटचं नेमकं करतो काय?
माहीला जास्त करून बॅटींग येत नाही पण ज्यावेळी येते तेव्हा त्याला जास्त चेंडू खेळायल शिल्लक असतात. त्यामुळे धोनी इतक्या बॅटींचं नेमकं करतो काय असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला आहे. याबाबत भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंह याने याबाबत खुलासा केला आहे. स्टार स्पोर्ट्स शोमध्ये बोलताना हरभजन सिंह याने खुलासा केलाय.
महेंद्र सिंह धोनीजवळ असलेल्या बॅट त्याला त्याच्याच संघातील सहकारी खेळाडू किंवा इतर खेळाडू मागतात. त्यावेळी धोनीला काही नाही बोलता येत नाही. त्यामुळे धोनीजवळ असलेल्या बॅट पर्वाच्या शेवटला फक्त 4 किंवा 5 राहत असल्याचं हरभजन सिंह याने सांगितलं. धोनीच्या बॅट बॉटमला म्हणजेच खालच्या बाजूने जड असतात. बॅटची खालची बाजू जास्त जड असते. भज्जीच्या मते, माहीलाही अशाच बॅट आवडतात.
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या बॅटची ताकद दिसली आहे. धोनीने आतापर्यंत चार डावात 59 च्या सरासरीने 59 धावा केल्या आहेत. यामध्ये धोनी फक्त एकदाच बाद झाला आहे. तर धोनीचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त असून 6 षटकार आणि 2 चौकार मारले आहेत. सीएसके संघाचा कर्णधार सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने चारवेळा सीएसकेला किताब जिंकून दिला आहे. तर पुण्याचं नेतृत्त्व करताना त्याने फायनलमध्ये धडक मारली होती.