मुंबई: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली आहे. आम्रपाली प्रकरणात ही नोटीस दिली आहे. एवढंच नाही, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) आम्रपाली समूह प्रकरणात सुरु झालेल्या मध्यस्थतेच्या प्रक्रियेलाही स्थगिती दिली आहे. मध्यस्थतेचा आदेश दिल्ली हायकोर्टाने धोनीच्या अर्जावरच दिला होता. आम्रपाली ग्रुपने आपली फी दिली नाही, असा धोनीने दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता. त्याने हायकोर्टाकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात धोनीला नोटीस बजावली आहे. धोनीच्या त्या अर्जानंतर आम्रपाली ग्रुप सर्वोच्च न्यायालयात गेला. सुप्रीम कोर्टाने धोनीला नोटीस पाठवली आहे. धोनीने सुप्रीम कोर्टात अर्ज करुन आपली 40 कोटी रुपये फी मिळवून देण्याची मागणी केली होती.
धोनी कधीकाळी आम्रपाली ग्रुपच बँड अॅम्बेसडर होता. 2016 साली धोनीने स्वत:ला आम्रपाली ग्रुप पासून वेगळं केलं.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या पिचप्रमाणेच उद्योग जगतातही जोरदार फलंदाजी करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनीने बिझनेस आणि गुंतवणूक क्षेत्रात नवी इनिंग सुरू केली आहे. क्रिकेटच्या पिचप्रमाणेच इथेही तो नव्या खेळाडूंवर विश्वास ठेवताना दिसतो. त्यामुळेच धोनीने अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सेकंड हँड कार विकणारी कंपनी कार्स 24, इंटिरिअर डेकोरेशन करणारी कंपनी होमलेनमध्ये ड्रोन बनवणारी गरूड एअरोस्पेस अशा अनेक कंपन्यांमध्ये त्याने महत्वपूर्ण गुंतवणूक केली आहे. त्याशिवाय रांचीमध्ये त्याचे हॉटेलही आहे. तसेच तो ऑरगॅनिक शेतीही करतो.
भारताचा माज कर्णधार असणाऱ्या धोनीच्या पोर्टफोलिओमधील सर्वात नव्या कंपनीचे नाव आहे गरुड एअरोस्पेस. सध्या वेगाने प्रगती करणाऱ्या ड्रोन बिझनेसमध्ये गुंतवणूकीची घोषणा धोनीने नुकतीच केली होती. त्याने या कंपनीत नुसती गुंतवणूकच केली नसून तो या कंपनीचा ब्रँड ॲंबॅसेडरही आहे. मात्र त्याने गरुड एअरोस्पेसमध्ये नक्की किती गुंतवणूक केली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. 2015 साली या कंपनीची सुरूवात झाली होती. कमी बजेटमध्ये ड्रोनसंदर्भातील सोल्यूशन्स देण्यावर कंपनीचा फोकस आहे. गरुड एअरोस्पेस ही कंपनी, सॅनिटायझेशन, ॲग्रीकल्चर, मॅपिंग, सिक्युरिटी, डिलीव्हरी इत्यादी सेवा पुरवते.