MS Dhoni : फॅन्स म्हणाले माही तू ग्रेट आहेस, माहीची ही कृती पाहून तुम्हीपण व्हाल फॅन!
Mahendra Singh Dhoni: महेंन्द्र सिंह धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्याच्या प्रत्येक कृतीची जोरदार चर्चा होत असती.
रांची : महेंद्र सिंह धोनी अशा मोजक्या खेळाडूंपैकी आहे, ज्याने मैदानाच्या बाहेरही तेवढाच मान सन्मान मिळवला आहे. कॅप्टन कूल धोनी आपल्या अचूक टायमिंगसाठी ओळखला जातो. धोनी आता भारतीय संघातून निवृत्त झाला असला तरी आयपीएलमध्ये त्याचा बोलबाला कायम आहे. प्रत्येक परिस्थितीत शांत, संयमी राहणारा धोनी अनेकांचा आदर्श आहे. क्रिकेट खेळावर धोनी जेवढे प्रेम करतो तेवढेच तो त्याच्या गाड्यांवरही प्रेम करतो. धोनीकडे जगातील तोडीस तोड गाड्या आहेत. धोनीचे गाड्यांसोबत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. धोनीला अनेक वेळा रांचीमध्ये गाडी चालवताना स्पॉट केलंय.
पाहा व्हिडीओ-
Dhoni’s Farmhouse is so big that he need bike to drop security guard at the Entrance ?
PS : Lucky security guard who gets bike ride with Dhoni . pic.twitter.com/l0KS3dkwmj
— MAHIYANK ™ (@Mahiyank_78) July 2, 2023
धोनी सध्या रांचीमध्ये त्याच्या फार्म हाऊसमध्ये आहे. सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. धोनीचे फार्म हाऊस खूपच मोठे आहे. धोनीच्या फार्म हाऊसच्या गेटवरुन आत घराकडे जायलाही गाडीचा वापर करावा लागतो. व्हायरल झालेल्या व्हिडीओत धोनीने त्याच्या सिक्युरिटी गार्डला फार्म हाऊसमधील घरापासून गेट पर्यंत बाईकने सोडले आहे.
सोशल मीडियावर धोनीचा एक जूना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ Mahiyank नावाच्या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आपल्या सिक्युरिटी गार्डला गेटवर सोडत आहे. यावरुन धोनीचे फार्म हाऊस किती मोठे असेल, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.
हे पहिल्यांदाच नाही तर धोनीने असं अनेकदा केलं आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये धोनी ग्राउंड स्टाफ आणि असोसिएशनच्या लोकांशी बोलताना दिसला होता. सोबतच धोनीने आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो काढले. आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो 2020 मधील आहे. या मधून हेच दिसते धोनी आपल्या स्टाफची खूप काळजी घेतो.