MS Dhoni, IPL 2022 : धोनीने आधी घेतला मुंबई इंडियन्सचा वर्ग, नंतर घेतला युवा खेळाडुंचा मास्टर क्लास

मुंबई इंडियन्स विरुद्ध 156 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना काल महेंद्र सिंग धोनी याने शेवट्या बॉलवर चौकार मारुन सामना जिंकला. त्याने तेरा बॉलवर नाबाद 28 धावा काढल्या. यानंतर त्याने मुंबई इंडियन्स आणि युवा खेळाडुंचा धोनीने मास्टर क्लास घेतला.

MS Dhoni, IPL 2022 : धोनीने आधी घेतला मुंबई इंडियन्सचा वर्ग, नंतर घेतला युवा खेळाडुंचा मास्टर क्लास
मुंबई इंडियन्सने ट्विट केलेला फोटोImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 4:38 PM

मुंबई : आयपीएल 2022च्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीने आपली धडाकेबाज खेळी दाखवली. गुरुवारी मुंबई इंडियन्स (MI) विरोधात चेन्नई सुपर (Chennai Super Kings) लढत खूपच रंगतदार ठरली. या सामन्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना  20 षटकात सात बाद 155 धावा केल्या. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला एमएस धोनी. (MS Dhoni) मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएल सीजनमधला हा सलग सातवा पराभव आहे. मुंबई इंडियन्स प्रमाणे चेन्नई सुपर किंग्सचा संघही या सीजनमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करतोय. दरम्यान, धोनीने दमदार खेळून तीन गडी राखून सामना जिंकला. यानंतर त्याने युवा खेळाडुंचा मास्टर क्लास घेत त्या्ंना मार्गदर्शन केलं.

पोस्टमध्ये काय आहे?

सामन्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये धोनी मुंबई संघाचे युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्मा यांच्याशी बोलताना दिसत आहे. मुंबई फ्रँचायझीने दोन फोटो शेअर केले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘ब्रेव्हिस आणि टिलकांसाठी काही उत्कृष्ट टिप्स देत आहे. काय अप्रतिम चित्र आहे.’

मुंबई फ्रँचायझीची पोस्ट

ब्रेव्हिस, तिलक जोरात

ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. ज्युनियर एबी डिव्हिलियर्स म्हणून प्रसिद्ध आहे. या मोसमातही त्याने पदार्पण केले आणि धमाल केली आहे. तर तिलक वर्माने याच सामन्यात चेन्नईविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले आहे. दोन्ही खेळाडू मुंबई संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

धोनीने तिसऱ्यांदा शेवटच्या षटकात 15 पेक्षा जास्त धावा केल्या

धोनीने मुंबईविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चार चेंडूत 16 धावा करून आणखी एक चमत्कार घडवला. शेवटच्या षटकात 15 हून अधिक धावा फटकावत त्याने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने मुंबईपूर्वी 2016 आणि 2010 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हा पराक्रम केला होता. 2016 मध्ये त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 22 आणि 2010 मध्ये इरफान पठाणच्या षटकात 18 धावा वसूल केल्या होत्या. योगायोगाने, धोनीने तिन्ही वेळा डावखुऱ्या गोलंदाजांसमोर शेवटच्या षटकात 15 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

इतर बातम्या

Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या कशी असेल लोकल सेवा

Encounter in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे चकमकीत चार दहशतवादी ठार

Udgir Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, साहित्य नगरीत उत्साह

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.