‘माही सरांकडून मला खूप मदत मिळाली’, भारतीय महिला क्रिकेट संघातील या खेळाडूला धोनीची शिकवणी!

भारतीय महिला क्रिकेट संघातील झारखंडची विकेट कीपर फलंदाज इंद्राणी रॉयने (Indrani Roy) कॅप्टन कूल एम एस धोनीकडून (MS Dhoni) क्रिकेटचे धडे घेतले आहेत. (MS Dhoni teach Indian Women Cricketer Indrani Roy)

'माही सरांकडून मला खूप मदत मिळाली', भारतीय महिला क्रिकेट संघातील या खेळाडूला धोनीची शिकवणी!
इंद्राणी रॉय इंग्लंड दौरा गाजवण्यासाठी सज्ज
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 6:47 AM

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Women Cricket Team) इंग्लंडच्या दौऱ्यावर जातोय. इंग्लंड दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताला इंग्लंडशी दोन हात करायचे आहेत. त्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरु आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील झारखंडची विकेट कीपर फलंदाज इंद्राणी रॉयने (Indrani Roy) कॅप्टन कूल एम एस धोनीकडून (MS Dhoni) क्रिकेटचे धडे घेतले आहेत. माही सरांच्या मार्गदर्शनाचा मला इथून पाठीमागे फायदा झालाय आणि आताही इंग्लंड दौऱ्यात त्यांनी सांगितलेल्या टिप्सचा मला फायदा होईल, असा विश्वास इंद्राणी रॉयने व्यक्त केलाय. (MS Dhoni teach Indian Women Cricketer Indrani Roy)

धोनीच्या इंद्राणी रॉयला खास टिप्स

सगळेच नवोदित खेळाडू धोनीकडून मार्गदर्शन मिळवण्यााठी प्रयत्न करत असतात. त्याने क्रिकेटमधल्या दोन गोष्टी आपल्याला सांगाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु असतो. इंग्लंड दौऱ्यासाठी जात असलेल्या इंद्राणी रॉयला धोनीकडून मार्गदर्शन मिळालंय. रांचीमध्ये ट्रेनिंग सेशनदरम्यान माहीने इंद्राणीला खास टिप्स दिल्यात. ज्याचा फायदा नजीकच्या काळात होईल, असा विश्वास इंद्राणीने व्यक्त केला आहे.

ट्यूशनच्या रस्त्यामध्ये क्रिकेटवर प्रेम, आठवीचं निकालपत्र कायमचं दुश्मन, 23 वर्षीय इंद्राणीचा आता फक्त धमाका सुरु…!

धोनीने इंद्राणीला कोणत्या टिप्स दिल्या?

रांचीमधल्या ट्रेनिंग सेशन दरम्यान माही सरांची आणि माझी दीर्घ मुलाखत झाली. यावेळी माझ्या खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी मी काय बदल करु, असा प्रश्न मी त्यांना विचारल्यावर तु रिफ्लेक्सला वेग द्यायला हवा तसंच पाच मीटर रेडियसमध्ये हालचाली वेगवान असायला हव्यात अशा दोन टिप्स माही सरांनी मला दिल्या, असं इंद्राणीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

माही सरांकडून टिप्स म्हणजे सन्मानाची गोष्ट

एका विकेट कीपरसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हे धोनीसरांशिवाय आणखी कोण चांगलं सांगू शकतं? त्यांनी दिलेल्या टिप्सची मी खेळत असताना अंमलबजावणी केलीय. मला त्याचा खूप फायदा झालाय आणि आताही इंग्लंड दौऱ्यात मला त्याचा फायदा होईल. माही सरांसारख्या दिग्गज खेळाडूकडून काही शिकणं म्हणजे नक्कीच सन्मानाची गोष्ट आहे. मी जेव्हा जेव्हा मैदानावर खेळण्यासाठी जाते, तेव्हा माही सरांनी दिलेल्या टिप्स आठवते, असं इंद्राणी म्हणाली.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा

भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱ्यात एकमात्र टेस्ट खेळायचीय. 16 जूनपासून या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. तसंच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी ट्वेन्टी मालिका देखील भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.

(MS Dhoni teach Indian Women Cricketer Indrani Roy)

हे ही वाचा :

Virat Kohli Vs Kane Williamson दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? आकडे कुणाच्या बाजूने?

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार

VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?
आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार?.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत
मुंबईकरांसाठी मोठी बातमी... मरिन ते वांद्रे सी-लिंक प्रवास 10 मिनिटांत.
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद
बेनाम बादशाह vs गद्दारीचा बादशाह, पालकमंत्रीपदावरुन महायुतीत वाद.
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल
राजकीय नेत्यांची मुजोरी अन् पोलिसांवरच शिरजोरी; व्हिडीओ व्हायरल.
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?
आरोपी कराडवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच डाऊट, दमानियांचा आरोप काय?.