INDA vs AUSA : ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम, टीम इंडियाकडून 195वर पॅकअप, मुकेश कुमारकडून 6 झटके

Australia A vs India A 1st unofficial Test : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 धावा केल्या. कांगारुंनी यासह 88 धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

INDA vs AUSA : ऑस्ट्रेलियाचा कार्यक्रम, टीम इंडियाकडून 195वर पॅकअप, मुकेश कुमारकडून 6 झटके
mukesh kumar 6 wickets ind a vs aus a
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 10:23 AM

टीम इंडिया नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी टीम इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात अनऑफीशियल टेस्ट मॅचेस खेळवण्यात येत आहेत. टीम इंडिया ए चं युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे नेतृत्व आहे. हा पहिला सामना ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 200 धावांच्या आत गुंडाळून मोठी आघाडी घेण्यापासून यशस्वीरित्या रोखलं आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव हा 195 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 88 धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाकडून मुकेश कुमार याने सर्वाधिक 6 झटके देत ऑस्ट्रेलियाला सुरुंग लावला.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर कांगारुंच्या एकाही फलंदाजाला 40 पार पोहचता आलं नाही. टॉप ऑर्डरमधील दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी चौघांनी 30+ धावा केल्या. कॅप्टन नॅथन मॅकस्विनी याने सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. कूपर कोनोली याने 37 धावांची खेळी केली. टॉड मर्फी आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी प्रत्येकी 33 धावा जोडल्या. मार्कस हॅरिस याने 17 तर फर्गस ओ नील याने 13 धावांची भर घातली. सॅम कोन्स्टास आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या दोघांना खातंही उघडता आलं नाही. तर इतर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

मुकेश कुमार याने 18.4 ओव्हरमध्ये 46 रन्सच्या मोबदल्यात या 6 विकेट्स घेतल्या. तर प्रसिध कृष्णा याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर नितीश कुमार रेड्डी याने 1 विकेट घेत मुकेश आणि प्रसिधला चांगली साथ दिली. त्याआधी टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात घोर निराशा केली. टीम इंडियाने पहिल्या डावात 47.4 षटकांमध्ये सर्वबाद 107 धावा केल्या. त्यानतंर कांगारुंना 195वर रोखल्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या डावात किती धावांचं आव्हान ठेवतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया 195 रन्सवर ढेर

टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इश्ववरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, बाबा इंद्रजीथ, इशान किशन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन: नॅथन मॅकस्विनी (कॅप्टन), सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, कूपर कोनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट आणि जॉर्डन बकिंगहॅम.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.