Ajinkya Rahane चा झंझावात सुरुच, पंड्याला सिक्स ठोकत SMAT स्पर्धेत फिफ्टीची हॅटट्रिक, मुंबई विजयाच्या दिशेने

Ajinky Rahane 3rd Consecutive Fifty : अजिंक्य रहाणे याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील निर्णायक सामन्यात विस्फोटक अर्धशतक झळकावलं आहे.

Ajinkya Rahane चा झंझावात सुरुच, पंड्याला सिक्स ठोकत SMAT स्पर्धेत फिफ्टीची हॅटट्रिक, मुंबई विजयाच्या दिशेने
ajinkya rahane 3rd consecutive fifty in smat 2024
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 2:17 PM

मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत तडाखा सुरुच आहे. रहाणेने स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. अजिंक्यने विजयी धावांचा पाठलाग करताना ही कामगिरी केली आहे. रहाणेने ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकत हे अर्धशतक पूर्ण केलं आहे. रहाणेने यासह या स्पर्धेत अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रहाणेचं हे सलग तिसरं अर्धशतक ठरलं आहे.

बडोदाने मुंबईला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं. रहाणेसोबत पृथ्वी शॉ ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र पृथ्वी 8 धावा करुन माघारी परतला. रहाणेने त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासोबतही तडाखेदार फलंदाजी सुरुच ठेवली. रहाणेने या दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. रहाणेने संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारत स्कोअरबोर्ड धावता ठेवला. त्यानंतर हार्दिक पंड्या 10 वी ओव्हर टाकायला आला.

हार्दिकने पहिला बॉल डॉट टाकला. रहाणेने दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. त्यानंतर श्रेयसने तिसऱ्या बॉलवर एक धाव घेत रहाणेला स्ट्राईक दिली. रहाणेने या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर खणखणीत षटकार खेचला. रहाणेने यासह अवघ्या 28 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेचं हे या स्पर्धेच्या हंगामातील सलग तिसरं आणि एकूण पाचवं अर्धशतक ठरलं.

रहाणेचं झंझावाती अर्धशतक

रहाणेची यंदाच्या मोसमातील कामगिरी

विरुद्ध गोवा : 13 धावा

विरुद्ध महाराष्ट्र : 52 धावा

विरुद्ध केरळ : 68 धावा

विरुद्ध सर्व्हिसेस : 22 धावा

विरुद्ध आंध्रा : 95 धावा

विरुद्ध विदर्भ : 84 धावा

विरुद्ध बडोदा : 51*

बडोदा प्लेइंग इलेव्हन : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, हार्दिक पांड्या, शिवालिक शर्मा, भानू पानिया, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरीवाला आणि आकाश महाराज सिंग.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.