Ranji Trophy Final | मुंबईच रणजी ट्रॉफी किंग, विदर्भ कॅप्टन अक्षय वाडकरचं झुंजार शतक व्यर्थ
Mumbai vs Vidarbha RanJji Trophy Final | मुंबईने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भावर विजय मिळवला आहे.
मुंबई | अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर 169 धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय. मुंबईने विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. विदर्भानेही जोरदार फाईटबॅक देत चौथा दिवस खेळून काढला. तर पाचव्या दिवशीही जोरदार सुरुवात केली. लंचनंतर विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकर शतक ठोकून आऊट झाला. मुंबईने लंचनंतर विदर्भाला एक एक करुन झटपट धक्के दिले. तर धवल कुलकर्णी याने आपल्या अखेरच्या सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिली आणि शेवटची विकेट घेत विदर्भाला ऑलआऊट केलं. विदर्भाचा दुसरा डाव 134.3 ओव्हरमध्ये 368 धावांवर आटोपला. मुंबईची ही रणजी ट्रॉफी जिंकण्याची 42 वी वेळ ठरली.
विदर्भाची बॅटिंग
विदर्भाकडून कॅप्टन अक्षय वाडकर याने सर्वाधिक 102 धावांची शतकी खेळी केली. मात्र त्याचं शतक व्यर्थ ठरलं. करुण नायर याने 74 धावांची खेळी केली. हर्ष दुबे याने 65 धावा केल्या. ओपनर अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी या दोघांनी प्रत्येकी 32 आणि 28 धावा केल्या. अमन मोखाडे याने 32 धावांचं योगदान दिलं. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर आदित्य ठाकरे नॉट आऊट राहिला. मुंबईकडून तनुष कोटीयन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मुशीर खान आणि तुषार देशपांडे या दोघांच्या खात्यात 2-2 विकेट्स गेल्या. तर शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी याने 1-1 विकेट घेतली.
मुंबईने रणजी ट्रॉफीवर 42 व्यांदा कोरलं नाव
We are the 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🏆❤️
Here’s to our 4️⃣2️⃣nd 𝐑𝐚𝐧𝐣𝐢 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲 𝐓𝐢𝐭𝐥𝐞! What a stellar performance from the boys 🙌🎉#RanjiTrophy #MCA #Mumbai #Cricket #IndianCricket #Wankhede #BCCI #Champions
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) March 14, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.