MUM vs VID | रहाणे-मुशीरची अर्धशतकं, मुंबईकडे दुसऱ्या दिवसअखेर 260 धावांची भक्कम आघाडी
Mumbai vs Vidarbha Ranji Trophy 2024 Final Highlights | मुंबईने दुसऱ्या डावात झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान या दोघांनी दुसऱ्या दिवासाचा खेळ संपेपर्यंत नाबाद भागीदारी केली. त्यामुळे लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी या दोघांचं उभं राहून टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.
मुंबई | रणजी ट्रॉफी फायनल सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. वानखेडे स्टेडियमवर आयोजित या महामुकाबल्यात मुंबईने विदर्भ विरुद्ध दुसऱ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 141 धावा केल्या आहेत. मुंबईे यासह 260 धावांची भक्कम आघाडी घेतली. मुंबईने झटपट 2 विकेट्स गमावल्यानंतर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावत मुंबईचा डाव सावरला. तसेच या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसापर्यंत 232 बॉलमध्ये नाबाद 107 धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे याने 58 आणि मुशीर खान 51 धावांवर नाबाद परतले आहेत.
मुंबईने पहिल्या डावात 224 धावांची खेळी केली. विदर्भाने या प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात ही 3 बाद 31 या धावसंख्येपासून केली. मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाची दाणादाण उडाली. मुंबईने दुसऱ्या दिवशी विदर्भाच्या 7 विकेट्स या 74 धावा देत घेतल्या. विदर्भाचा डाव अशाप्रकारे 45.3 ओव्हरमध्ये 105 धावांवर आटोपला. मुंबईला अशाप्रकारे 119 धावांची आघाडी मिळाली. मुंबईने या आघाडीसह दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात केली. मात्र मुंबईची निराशाजनक सुरुवात झाली.
पृथ्वी शॉ 11 आणि भूपेन ललवाणी 18 धावा करुन माघारी परतले. मुंबईची स्थिती 2 बाद 34 अशी झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान या दोघांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकं केली. अजिंक्यनंतर मुशीरने अर्धशतक झळकावलं. दोघांनी केलल्या या खेळीमुळे मुंबई चांगल्या स्थितीत पोहचली. रहाणेने 109 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 58 धावा केल्या. तर मुशीर खान याने 135 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 51 धावा केल्या आहेत.
दुसरा दिवस मुंबईचा
That’s stumps on Day 2 of the #RanjiTrophy #Final 🙌
Unbeaten half-centuries from Captain Ajinkya Rahane & Musheer Khan guide Mumbai to 141/2 in the second innings 👌👌
They now lead by 260 runs.
Scorecard ▶️ https://t.co/L6A9dXXPa2#MUMvVID pic.twitter.com/UyOJ6oX4sS
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.