MUM vs VID | शार्दूल ठाकुरची एकाकी झुंज, मुंबईच्या पहिल्या डावात 224 धावा
Ranji Trophy Final | मुंबईचा पहिला डाव हा 224 धावांवर आटोपला. शार्दूल ठाकुर याने केलेल्या झंझावाती खेळीच्या मदतीने मुंबईला 200 प्लस स्कोअर करता आला.
मुंबई | रणजी ट्रॉफी फायनल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत मुंबईचा पहिला डाव आटोपला आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याच्या 75 धावांच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ऑलआऊट 224 धावा केल्या. शार्दूलने केलेल्या चिवट खेळीमुळे मुंबईला 200 पार मजल मारता आली. टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या मुंबईची शानदार सुरुवात झालेली. मात्र त्यानंतर विदर्भच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईचा डाव गडगडला. पण शार्दुलने एकट्याने डाव सावरत मुंबईसाठी तारणहाराची भूमिका बजावली.
मुंबईची बॅटिंग
मुंबईकडून शार्दूल ठाकुर याने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. शार्दूलने कोणताही दबाव न घेता बेछूट बॅटिंग केली. शार्दुलने 69 बॉलमध्ये 8 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. शार्दूल आऊट होताच मुंबईचं 64.3 ओव्हरमध्ये पॅकअप झालं. तर धवल कुलकर्णी झिरोवर नाबाद परतला. शार्दूल व्यतिरिक्त मुंबईकडून पृथ्वी शॉ याने 63 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली.
भुपेन ललवाणी याने 63 बॉलमध्ये 4 चौकारांसह 37 धावांचं योगदान दिलं. शम्स मुलानी याने 13 आणि तुषार देशपांडे याने 14 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी निराशा केली. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने घोर निराशा केली. रहाणे 7 धावांवर आऊट झाला. श्रेयस अय्यर यालाही काही ग्रेट करता आलं नाही. श्रेयस 7 धावा करुन माघारी परतला. मुशीर खान याने 6, हार्दिक तामोरे 5 आणि तनुष कोटीयन याने 8 धावा केल्या. विदर्भाकडून आदित्य सरवटे याचा अपवाद वगळता 5 पैकी 4 गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.
शार्दूल ठाकुरची धमाकेदार खेळी
Innings break!
Vidarbha have bowled Mumbai out for 224 in the first innings.
3⃣ wickets each for Harsh Dubey & Yash Thakur
Shardul Thakur top-scored for Mumbai with 75(69)@IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/hrkFFcIPCb
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 10, 2024
हर्ष दुबे आणि यश ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत मुंबईचा अर्धा संघ तबूत पाठवला. उमेश यादव याने एकूण 2 विकेट्स घेतल्या. तर आदित्य ठाकरे याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तर आदित्य सरवटे अपयशी ठरला.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.