टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तब्बल 12 वर्षानंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. पाहुण्या न्यूझीलंडने टीम इंडियाला आधी बंगळुरु आणि त्यांनतर पुणे कसोटी सामन्यात पराभूत करत मालिका आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता मालिकेतील तिसरा आणि अंतिम साना हा 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकून व्हाईटवॉश करण्यासह विजयी हॅटट्रिक करण्याची दुहेरी संधी आहे. तर टीम इंडियासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे होणार आहे. मात्र मुंबईत जन्मलेला एक खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरु शकतो. याच खेळाडूने 3 वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता.
न्यूझीलंडच्या गोटातील फिरकी गोलंदाज एजाज पटेल याच्याबाबत आपण बोलत आहोत. एजाज पटेल हा जरी न्यूझीलंडसाठी खेळत असला तरी तो जन्माने मुंबईकर आहे. एजाजचे कुटुंबिय तो 8 वर्षांचा असताना न्यूझीलंडला गेले आणि ते तिथेच स्थायिक झाले. न्यूझीलंड टीम 2021 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा एजाजने मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इतिहास घडवला होता. एजाजने वानखेडे स्टेडियममध्ये चक्क एका डावात 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे आताही टीम इंडियाला त्याची भीतीत सतावत आहे.
एकट्या एजाजने टीम इंडियाला गुंडाळत 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आताही वानखेडेत एजाज त्याचप्रकारे कामगिरी करुन न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान आतापर्यंत एजाजने एकूण 19 कसोटी आणि 7 टी 20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं आहे. एजाजने कसोटीत 72 तर टी 20i क्रिकेटमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.