Ranji Trophy Final मध्ये कॅप्टन अजिंक्य रहाणे याचं अर्धशतक, टीकाकारांना चोख उत्तर
Ajinkya Rahane Fifty | अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये दुसऱ्या डावात मुंबईसाठी अर्धशतक ठोकलंय. रहाणेने या अर्धशतकासह टीकाकारांना जोरदार उत्तर दिलं आहे.
मुंबई | मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भ विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत चौकार ठोकून अफलातून अर्धशतक ठोकलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीमध्ये धडक मारली. मात्र रहाणेला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामळे रहाणेवर चौफेर टीका करण्यात येत होती. मात्र रहाणे अंतिम फेरीत अर्धशतक ठोकून टीकाकाराना चोख उत्तर दिलं आहे.
अजिंक्य रहाणेने 42 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर चौकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेने उमेश यादव याच्या बॉलिंगवर चौकार लगावला. रहाणे या अंतिम फेरीत एकूण आणि मुंबईकडून शार्दूल ठाकुर याच्यानंतर अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. तसेच या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील रहाणेचं हे दुसरं अर्धशतक ठरलं. अजिंक्य रहाणे याने 88 चेंडूत 4 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने हे अर्धशतक झळकावलं. अजिंक्यच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 37 वं अर्धशतक ठरलं. रहाणेने 58 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं.
तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
दरम्यान अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केलीय. मुंबईला भूपेन ललवाणी याच्या रुपाने दुसरा झटका लागला. ललवाणी 18 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे मुंबईची स्थिती 2 बाद 34 अशी झाली. मात्र त्यानंतर अजिंक्य आणि मुशीर या दोघांनी मुंबईचा डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
अजिंक्य रहाणे याची अर्धशतकी खेळी
Ajinkya Rahane brings up his 5⃣0⃣ in style 👏
He’s steadied the ship with a composed knock so far 👌@ajinkyarahane88 | @IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/rvqqqzymAn
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.