6,6,6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4, 15 बॉलमध्ये 80 धावा, Shreyas Iyer ची स्फोटक शतक खेळी

Shreyas Iyer Century : श्रेयस अय्यर याने या शतकी खेळीत विस्फोटक फलंदाजी केली. श्रेयसने या नाबाद 114 धावांच्या खेळीतील 80 धावा या अवघ्या 15 चेंडूत केल्या.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4,4, 15 बॉलमध्ये 80 धावा, Shreyas Iyer ची स्फोटक शतक खेळी
shreyas iyer mumbai captainImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 3:17 PM

मुंबईने 15 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशचा धुव्वा उडवत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाचा फलंदाज आणि मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. त्यानंतर या श्रेयस अय्यर याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तडाखेदार सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यर याने कर्नाटविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात झंझावाती खेळी करत स्फोटक आणि नाबाद शतक झळकावलं आहे. श्रेयसच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 300 पार मजल मारली आहे.

श्रेयसने अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. श्रेयसने आधी 31 बॉलमध्ये फिफ्टी केली.त्यानंतर पुढील 19 चेंडूंमध्ये आणखी 50 धावा जोडल्या. श्रेयसने अशाप्रकारे 50 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर त्यानंतर शेवटच्या 5 बॉलमध्ये श्रेयसने 14 रन्स जोडल्या. श्रेयसने अशा पद्धतीने 55 बॉलमध्ये 207 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 114 रन्स केल्या. श्रेयसने या खेळीत 10 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकार झळकावले. श्रेयसने षटकार आणि चौकारांच्या मदतीने 15 चेंडूत 80 धावा केल्या.

श्रेयसच्या या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 382 धावा केल्या. श्रेयस व्यतिरिक्त हार्दिक तामोरे याने 84 आणि आयुष म्हात्रे 78 धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने 5 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 36 चेंडूत नाबाद 63 धावा केल्या. तसेच कर्नाटकाकडून प्रवीण दुबे याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर विद्याधर पाटील आणि श्रेयस गोपाळ या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

श्रेयस अय्यरचा शतकी झंझावात

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), आंगकृष्ण रघुवंशी, आयुष म्हात्रे, सूर्यकुमार यादव, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकूर आणि एम जुनेद खान.

कर्नाटक प्लेइंग ईलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), अनिश केव्ही, निकिन जोस, स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), श्रेयस गोपाळ, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, वासुकी कौशिक आणि विद्याधर पाटील.

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.