IPL 2022 : Mumbai Indians कमबॅक करणार? इतिहास सांगतो, 4 वेळा हरुनही MI झालेली बाजीगर

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक सामना सारखा नसतो आणि प्रत्येक संघाचे कायम चांगले दिवस किंवा कायम वाईट दिवस नसतात. आयपीएल 2022 या स्पर्धेने ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

IPL 2022 : Mumbai Indians कमबॅक करणार? इतिहास सांगतो, 4 वेळा हरुनही MI झालेली बाजीगर
Mumbai IndiansImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:38 AM

मुंबई : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक सामना सारखा नसतो आणि प्रत्येक संघाचे कायम चांगले दिवस किंवा कायम वाईट दिवस नसतात. आयपीएल 2022 या स्पर्धेने ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. सध्याचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आत्ताची परिस्थिती पाहून ही गोष्ट ठळक होते. चार वेळा चॅम्पियन बनलेल्या चेन्नईने आणि पाच वेळा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील पहिले चारही सामने गमावले आहेत. दोन्ही संघांसाठी ही परिस्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या सामन्याद्वारे चेन्नईने गुणांचे खाते उघडल्याने मुंबई इंडियन्सही आत्मविश्वासाने पुनरागमन करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हा संघ यापूर्वीदेखील अशा परिस्थितीवर मात करुन पुढे आला आहे. या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे संघाला आणि त्यांच्या कर्णधाराला चांगलंच माहीत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात आतापर्यंत प्रत्येक सामन्यात हरला आहे. पाचवेळा आयपीएल विजेता कर्णधार आणि त्याचा संघ पूर्वीसारखा मजबूत वाटत नाही. फेब्रुवारीत पार पडलेल्या लिलावात नव्याने खरेदी केलेल्या खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी झालेली नसल्याने संघाची बिकट परिस्थिती आहे. महा लिलावात मुंबईने अनेक बडे खेळाडू गमावल्यानेही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मुंबईसोबत असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सर्वात यशस्वी संघ असूनही, मुंबईसोबत चौथ्यांदा असं घडलंय जेव्हा या संघाने एका हंगामातील चार सामने गमावले आहेत.

चार वेळा सुरुवातीचे चार सामने गमावले

हा मथळा वाचून सर्वांना आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. मुंबई व्यतिरिक्त कोणत्याही संघाने मोसमातील पहिले चार सामने इतक्या वेळा गमावले नाहीत. 2008 च्या पहिल्या सत्रात, संघाने सलग 4 सामने गमावले होते, परंतु नंतर हंगाम संपेपर्यंत संघ पाचव्या स्थानावर पोहोचला होता. 2014 आणि 2015 मध्येदेखील संघावर अशीच परिस्थिती ओढवली होती. 2014 मध्ये पहिले 4 सामने गमावूनही MI ने जबरदस्त पुनरागमन केले आणि नंतर हा संघ प्लेऑफसाठी देखील पात्र ठरला, प्लेऑफमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला.

2015 मध्ये जोरदार मुसंडी

त्यानंतर पुढच्या मोसमातही त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली, पण यावेळी संघाने चांगल्या पद्धतीने पुनरागमन केले. पहिले चार सामने गमावल्यानंतर मुंबईचा खेळ खल्लास झालाय, असं बोललं जाऊ लागलं होतं. पण यावेळी संघाने नुसतं कमबॅक केलं नाही तर संघाने साखळी फेरीनअखेर गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. त्यानंतर अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून या संघाने दुसरे विजेतेपद जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले.

इतर बातम्या

IPL 2022 Points Table: आयपीएलच्या गुणतालिकेत तुमचा संघ कुठे, तुमच्या आवडत्या संघाची आगेकुच की पिछेहाट?, जाणून घ्या

IPL 2022 MI vs PBKS Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध पंजाब सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022, Orange Cap, Purple cap : 9 षटकार मारुन उथप्पाची आगेकुच, ऑरेंज कॅपच्या यादीत कोण आहे पुढे? पर्पल कॅपवर कुणाचं राज्य?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.