हार्दिक पांड्या खेळणार नाही! आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धक्का

आयपीएल 2025 स्पर्धेची लिलाव प्रक्रिया पार पडली असून दहाही संघ आता स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. चार महिन्यांनी म्हणजेच मार्च महिन्यात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. पण पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धक्का बसला. हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे.

हार्दिक पांड्या खेळणार नाही! आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धक्का
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 3:16 PM

आयपीएल 2025 अर्थात 18 व्या पर्वासाठी दहाही संघ सज्ज झाले आहेत. रिटेन्शननंतर फ्रेंचायझींनी संघ मजबूत करण्यासाठी खेळाडूंवर मोठा डाव लावला. तसेच संघाची बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला. पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स हे संघ पहिल्या जेतेपदासाठी आतुर आहेत. दुसरीकडे, पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात धक्का बसला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात मुकावं लागणार आहे. त्याचं कारण दुखापत वगैरे नाही. तर मागच्या पर्वात केलेली एक चूक कर्णधार हार्दिक पांड्याला भोवणार आहे. 2024 आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ठरलेल्या वेळेत 20 षटकं पूर्ण केली नाहीत. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला 30 लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या आयपीएल स्पर्धेत त्याच्यावर एका सामन्याची बंदी कायम असणार आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आयपीएल 2025 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं पहिल्या सामन्यात नेतृत्व जसप्रीत बुमराह किंवा सूर्यकुमार यादव करण्याची शक्यता आहे.

आयपीएल नियमानुसार प्रत्येक संघाला दीड तासात 20 षटकं पूर् करावी लागतात. अधिक वेळ घालवल्यास एक क्षेत्ररक्षक कमी केला जातो आणि चूक करणाऱ्या संघाला 12 लाखांचा दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा अशीच चूक केली तर कर्णधाराला 24 लाखांचा दंड भरावा लागतो. तसेच उर्वरित 10 खेळाडूंना प्रत्येकी 6 लाख किंवा मॅच फीच्या 25टक्के दंड आकारला जातो. ही चूक तिसऱ्यांदा केली तर कर्णधाराला 30 लाखांचा दंड ठोठावला जातो. तसेच कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. तसेच प्लेइंग इलेव्हनमधील इतर 10 खेळाडूंना दंड म्हणून 12 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के दंड भरावा लागतो.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 स्पर्धेत अशी चूक तीनदा केली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दोन वेळा आणि पंजाब किंग्जविरुद्ध स्लो ओव्हर रेटची चूक केली. त्यामुळे हार्दिक पांड्यावर आयपीएल 2024 स्पर्धेत एका सामन्याची बंदी घातली जाणार हे निश्चित आहे. पण या स्पर्धेपूर्वी आयपीएल प्रशासन या नियमात काय शिथिलता आणते का? की नियम तसाच ठेवते याकडे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सचा 2025 स्पर्धेसाठी संघ (एकूण खेळाडू : 23)

मुंबई इंडियन्सने रिटेन खेळाडू : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव.

आयपीएल मेगा लिलावात घेतलेले खेळाडू : जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, लिज्जाड विलियम्स आणि अश्वनी कुमार.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....