IPL 2022: Mumbai Indians कमबॅक करेल, Rajasthan Royals च्या प्रशिक्षकांना विश्वास

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) स्वतःवर विश्वास नसेल जितका राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकांनी दाखवला आहे.

IPL 2022: Mumbai Indians कमबॅक करेल, Rajasthan Royals च्या प्रशिक्षकांना विश्वास
Mumbai Indians Image Credit source: MI Twitter
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 11:47 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) स्वतःवर विश्वास नसेल जितका राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रशिक्षकांनी दाखवला आहे. राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) मुंबई इंडियन्स संघ जोरदार कमबॅक करेल असं म्हटलं आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबईची सुरुवात कशीही झाली असली तरी मुंबई इंडियन्स या स्पर्धेचा शेवट चांगल्या प्रकारे करेल असेही मलिंगा म्हणाला. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सला आतापर्यंत झालेल्या सर्व 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचा समतोल बिघडला आहे, मैदानावर खेळाडूंमध्ये ताळमेळ नाही, स्पर्धेत या संघाची गोलंदाजी सर्वात वाईट आहे. आता जर संग सर्वच आघाड्यांवर कमजेर असेल तर संघाची गुणांची झोळी रिकामीच असणार. मुंबईने अद्याप स्पर्धेत गुणांचं खातं उघडलेलं नाही. हा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.

या सगळ्यानंतरही लसिथ मलिंगा म्हणाला मुंबई इंडियन्स हा संघ त्यांच्या कमबॅक मूडसाठी ओळखला जातो. ही टीम पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करुन दाखवेल. मलिंगाच्या मते, मुंबईच्या पलटणने याआधीदेखील सुरुवातीच्या पराभवानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे आणि यावेळीही असेच काहीसे घडेल.

मुंबई इंडियन्स कमबॅक करेल : मलिंगा

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर, राजस्थानचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक मलिंगाने ट्विट केले आणि लिहिले आहे की, “मुंबईचा संघ पुनरागमन करण्यासाठी ओळखला जातो. तो यंदा प्लेऑफमध्ये पोहोचेल की नाही, हे मी सांगू शकत नाही. पण हा संघ स्पर्धेचा समारोप मोठ्या दिमाखात करेल हे मात्र नक्की. आणि तसे करण्याची इच्छा आणि अपेक्षा त्यांच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या मनात असेल.”

कर्णधार रोहितलाही पुनरागमनाचा विश्वास

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 19 धावांनी पराभव करत मुंबईच्या सहाव्या पराभवाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना लखनौ संघाने केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 181 धावाच करू शकला. या पराभवानंतर मात्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही आपला संघ पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय

DC vs RCB IPL 2022 Dinesh Karthik: ये एज-वेज में विश्वास नही रखता, सगळ्यांची एकच भावना, त्याला T-20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये घ्याच

DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.