IPL 2025: मुंबईचा ऑक्शनआधी मोठा निर्णय, या दिग्गजाकडे पुन्हा मोठी जबाबदारी

Ipl 2025 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयपीएलच्या इतिहासात एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. पलटणने गेल्या हंगामाआधी कॅप्टन बदलला होता. आता ऑक्शनआधी तसाच निर्णय घेण्यात आला आहे.

IPL 2025: मुंबईचा ऑक्शनआधी मोठा निर्णय, या दिग्गजाकडे पुन्हा मोठी जबाबदारी
Rohit Sharma And Mahela Jayawardene Mumbai IndiansImage Credit source: Mumbai Indians
Follow us
| Updated on: Oct 13, 2024 | 6:10 PM

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स अर्थात पलटणच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पलटणने आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी (2025) संघात मोठा बदल केला आहे. मुंबईने दिग्गज खेळाडूची पुन्हा एकदा मोठ्या पदावर फेरनियुक्ती केली आहे. मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने यांची नियुक्ती केली गेली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेटकीपर फलंदाज मार्क बाऊचर याच्या जागी महेला जयवर्धनेची वर्णी लागली आहे. महेला जयवर्धने याने याआघी 2017 ते 2022 या दरम्यान हेड कोच म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर आता पुन्हा जयवर्धनेच्या मार्गदर्शनात पलटण कशी कामगिरी करते? याकडे लक्ष असणार आहे.

मार्क बाऊचरने 2023 आणि 2024 या 2 हंगामात मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र बाऊचरच्या अनुभवाचा मुंबईला काही खास फायदा झाला नाही. मुंबईने आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकूण 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यापैकी जयवर्धनेच्या प्रशिक्षकपदाच्या पहिल्या कारकीर्दीत मुंबईने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. जयवर्धनेच्या मार्गदर्शनात मुंबईने 2017, 2019 आणि 2020 मध्ये ट्रॉफी जिंकली आहे.

पलटणची निराशाजनक कामगिरी

मुंबईला गेल्या हंगामात (IPL 2024) लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून पहिल्या स्थानी अर्थात 10 व्या क्रमांकावर राहिली. मुंबईला 14 पैकी फक्त 4 सामन्यातच विजय मिळवता आला होता. तर तब्बल 10 सामन्यात प्रतिस्पर्धी संघांनी पलटणला पराभवाची धुळ चारली होती. मुंबईच्या गोटात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यासारखे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू असूनही ही वेळ ओढावली होती. त्यानंतर मार्क बाऊचरला हटवण्याची मागणी क्रीडा विश्वात करण्यात येत होती. अखेर मार्क बाऊचरला हटवण्यात आलं आहे. त्यामुळे आता जयवर्धनेच्या कमबॅकनंतर पलटणची कामगिरी कितपत सुधारते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

महेला जयवर्धने पुन्हा पलटणचा हेड कोच

कर्णधारपदावरुन वाद

दरम्यान गेल्या हंगामात रोहित शर्मा याच्या जागी हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पंड्यावर अनेकदा सडकून टीका केली होती. टीम मॅनेजमेंटने हार्दिकला कर्णधार केलं होतं. त्यात हार्दिकची कोणतीच चूक नव्हती. मात्र रोहितला हटवल्याचा राग चाहत्यांनी हार्दिकवर विविध माध्यमातून काढला होता. तसेच कर्णधारपदामुळे रोहित आणि हार्दिक यांच्यात धुसफूस आणि वादावादी असल्याचा दावाही करण्यात आला होता. तसं काही झालं नसलं तरी टीम मॅनेजमेंटच्या कर्णधार बदलण्याचा निर्णयाचा परिणाम पलटणच्या कामगिरीवर दिसून आला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता जयवर्धने पलटणसाठी काय करतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….