IPL Auction 2021 Mumbai Indians Live Updates | सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

| Updated on: Feb 19, 2021 | 11:50 PM

IPL Auction 2021 Mumbai Indians Live Updates | गतविजेत्या मुंबईकडे लिलावासाठी 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध असून मुंबईचा संघ त्यांच्या ताफ्यात 7 नवे खेळाडू समावून घेणार आहे.

IPL Auction 2021 Mumbai Indians Live Updates | सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या (IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. आयपीएलमधील आठ संघांकडून त्यांच्याकडील खेळाडू आणि संघातून मुक्त करणाऱ्या खेळाडूंची यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. तसेच काही संघांनी लिलावापूर्वीच (IPL 2021 Auction) खेळाडूंची अदलाबदली केली आहे. दरम्यान IPL 14 साठी खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 292 खेळाडू उतरले असून ही प्रक्रिया चेन्नईमध्ये सुरु आहे. दरम्यान, गतविजेत्या मुंबईकडे लिलावासाठी 15 कोटी 35 लाख रुपयांची राशी उपलब्ध असून मुंबईचा संघ त्यांच्या ताफ्यात 7 नवे खेळाडू समावून घेणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Feb 2021 08:36 PM (IST)

    सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबईच्या ताफ्यात

    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात सामावून घेतलं आहे.

  • 18 Feb 2021 07:53 PM (IST)

    युधवीर चरक मुंबईच्या संघात

    युधवीर चरक या खेळाडूला मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बोलीवर खरेदी केलं आहे.

  • 18 Feb 2021 07:51 PM (IST)

    मार्को जेसन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

    दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मार्को जेसन याला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केली आहे.

  • 18 Feb 2021 07:45 PM (IST)

    अष्टपैलू जेम्स निशम मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

    न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशमला मुंबईने त्यांच्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. निशमसाठी मुंबईने 50 लाख रुपये मोजले आहेत.

  • 18 Feb 2021 04:57 PM (IST)

    2.40 कोटींच्या बोलीवर फिरकीपटू पियुष चावला मुंबईच्या ताफ्यात

    अनुभवी फिरकीपटू पियुष चावला मुंबईच्या निळ्या जर्सीत पाहायला मिळणार आहे. मुंबईने 2.40 कोटी रुपयांच्या बोलीवर चावलाला त्यांच्या संघात सामावून घेतलं आहे. पियुषला संघात सामावून घेण्यासाठी दिल्ली आणि मुंबईत चढाओढ पाहायला मिळत होती. परंतु पियुषला संघात सामावून घेण्याचा पक्का निर्धार मुंबईने केला होता. अखेर दिल्लीला नमवत मुंबईने पियुष चावलाला त्यांच्या संघात सामावून घेतलं आहे.

  • 18 Feb 2021 04:47 PM (IST)

    रिलीज केलेल्या नॅथन कुल्टर नाईलचं मुंबईच्या संघात पुनरागमन

    मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलला त्यांच्या संघातून रिलीज केलं होतं (संघमुक्त केलं होतं). त्यानंतर मुंबईच्या संघाने आज कुल्टर नाईलला 5 कोटी रुपयांच्या बोलीवर संघात पुन्हा सामावून घेतलं आहे.

  • 18 Feb 2021 04:34 PM (IST)

    मुंबईच्या ताफ्यात नवा जलदगती गोलंदाज, न्यूझीलंडच्या खेळाडूसाठी मोजले इतके कोटी

    मुंबई इंडियन्सने न्यूझलंडचा जलदगती गोलंदाज अॅडम मिल्न याच्यासाठी तब्बल 3.20 कोटी रुपये मोजले आहेत. अॅडमसाठी सुरुवातीला राजस्थान रॉयल्स आणि मुंबईमध्ये चुरस सुरु होती. त्यानंतर यामध्ये सनरायझर्स हैदराबादने उडी घेतली. अखेर ही स्पर्धा मुंबईने जिंकली. मुंबईने 3.20 कोटी रुपयांच्या बोलीवर अॅडम मिल्न याला ताफ्यात सामावून घेतले.

  • 18 Feb 2021 02:06 PM (IST)

    मुंबईच्या संघातील सध्याचे 18 खेळाडू

    मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्वींटन डी कॉक, राहुल चाहर, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, सौरभ तिवारी आणि मोहसिन खान

  • 18 Feb 2021 02:05 PM (IST)

    मुंबईच्या संघात 7 नवे खेळाडू दिसणार

    • खेळाडूंची संख्या : 18
    • परदेशी खेळाडूंची संख्या : 04
    • शिल्लक खेळाडूंची जागा : 07
    • परदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 04
    • मुंबईकडे असलेली रक्कम – 15 कोटी 35 लाख
  • 18 Feb 2021 02:04 PM (IST)

    मुंबईच्या संघात 4 परदेशी खेळाडूंना संधी

    गतविजेत्या ठरलेल्या मुंबईकडे एकूण 18 खेळाडू आहेत. यामध्ये एकूण 4 विदेशी खेळाडू आहेत. म्हणजेच मुंबईला या लिलावातून एकूण 7 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. मुंबई त्यापैकी 4 परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेणार आहे.

Published On - Feb 18,2021 8:36 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.