IPL 2022, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा आठवा पराभव, लखनऊचा जोरदार विजय

लखनौने मुंबई इंडियन्सला 168 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईने वीस ओवरमध्ये 8 बाद 132 धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ सलग आठव्यांदा पराभूत झाला आहे.

IPL 2022, MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा आठवा पराभव, लखनऊचा जोरदार विजय
मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा आठवा पराभवImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:30 AM

मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामात लखनौने (LSG) मुंबई इंडियन्सला (MI) 168 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण ते त्यांना पूर्ण करता आलं नाही. मुंबईने वीस ओवरमध्ये 8 बाद 132 धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ सलग आठव्यांदा पराभूत झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात सर्वाधिक धावा रोहित शर्माने काढल्या. त्याने 31 चेंडूत 39 धावा काढल्या. तर यात पाच चौकार आणि एक षटकार त्याने मारला. टिळक वर्मा देखील चांगलं खेळला. त्याने 27 चेंडूत 38 धावा काढल्या. त्यात दोन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. किरॉन पोलार्ड याने 20 चेंडूत 19 धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार ठोकला. त्याननंतर इशान किशनने आठ धावा काढल्या. तर देवाल्ड ब्रेव्हिसने तीन, डॅनियल सॅम्सने तीनआणि जयदेव उनाडकट याने एक धावा काढली. यामुळे मुंबई इंडियन्सला 168 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही आणि लखनौचा विजय झाला.

तिलक शर्माच्या षटकारची चर्चा, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लखनौने किती धावा काढल्या

लखनौला क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला धक्का बसला. तो नऊ चेंडूत 10 धावा काढून बाद झाला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. त्यानंतर किरॉन पोलार्डने लखनौची दुसऱ्या विकेटची मोठी भागीदारी तोडण्यात यश मिळवलं. त्याच्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने मनीषला मेरेडिथकरवी झेलबाद केले. मनीषने बाद होण्यापूर्वी 22 चेंडूत 22 धावा केल्या. तर दुसरीकडे मार्कस स्टॉइनिस पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो डॅनियल सॅमने टिळक वर्माच्या हाती झेलबाद झाला. लखनौने तीन चेंडूंत त्यांचे दोन मोठे विकेट गमावले. कृणाल पांड्याही काही विशेष करू शकला नाही आणि एक धाव काढून पोलार्डच्या चेंडूवर शौकीनकडे झेलबाद झाला. अशा प्रकारे लखनौने 20 ओवरमध्ये 6 बाद 168 धावा काढल्या होत्या.

केएल राहुलचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केएल राहुलचं शतक, अर्धशतक

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकारासह मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याने दोन्ही शतके मुंबईविरुद्धच झळकावली. एका हंगामात एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा तो कोहलीनंतरचा दुसरा खेळाडू आहे. तर त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक आपल्या नावावर केले आहे. यावेळी त्याने 37 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

केएल राहुलचं शतक, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इतर बातम्या

दगडफेक करणारे शिवसैनिक असतील तर त्याचा आम्हाला अभिमान

Marathi Sahity Sammelan: पुस्तकांनीच मला माझ्या जीवनाचे तत्वज्ञान शिकवले; साहित्य संमेलनाची नितीन गडकरींंच्या उपस्थितीत सांगता

Special Report | फक्त एकमेकांचे हिशेब चुकते केले जातायत का?

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.