Hardik Pandya मुंबईत परतल्यावर नीता अंबानी झाल्या खूश, दिली पहिली प्रतिक्रिया
यंदाच्या सीझनमध्ये हार्दिक पंड्या परत एकदा निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. हार्दिक पंड्या परत आल्याने मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानीसुद्धा खूश झाल्या आहेत.
मुंबई : आयपीएल सीझन 2024 च्या आधी मुंबई इंडियन्स संघाच्या मॅनेजमेंटने मोठी चाल खेळली आहे. स्टार ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. मुंबईने यासाठी आपल्या संघातील कॅमेरून ग्रीन याल आरसीबीला दिलं आहे. पंड्या मुंबईचा जुना भिडू असल्याने मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या सीझनमध्ये हार्दिक पंड्या परत एकदा निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. हार्दिक पंड्या परत आल्याने मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानीसुद्धा खूश झाल्या आहेत.
नीता अंबानी काय म्हणाल्या?
हार्दिक परत एकदा संघात परतल्याचा खूप आनंद आहे. मुंबई इंडियन्सच्या कुटंबासोबत हे एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे. मुंबई इंडियन्स संघाचा युवा खेळाडू ते टीम इंडियाचा स्टार खेळाडू बनण्यापर्यंत हार्दिकने मोठी मजल मारली आहे. मुंबई इंडियन्स आणि हार्दिकच्या भविष्यात काय पुढे काय होणार हे पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचं नीता अंबानी यांनी म्हटलं आहे.
“We are thrilled to welcome Hardik back home! It’s a heartwarming reunion with our Mumbai Indians family! From being a young scouted talent of Mumbai Indians to now being a team India star, Hardik has come a long way and we’re excited for what the future holds for him and Mumbai… pic.twitter.com/7UrqfjUEXU
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
हार्दिक पंड्याच्य संघात येण्याने मुंबई इंडियन्सची ताकद आणखी वाढली आहे. संघाला एक दर्जेदार बॉलर आणि बॅट्समन मिळालं आहे. हार्दिक परत एकदा संघात परतला आहे, याआधी त्याला मुंबईनेच 2015 साली आयपीएल लिलावामध्ये घेतलं होतं. त्यावेळी हार्दिकला 10 लाख या बेस प्राईजवर त्याने विकत घेतलं होतं. पठ्ठ्याला परत घेण्यासाठी तब्बल 15 कोटी रूपये मोजावे लागले आहेत.
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, स्काय, इशान किशन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅम ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (ट्रेड)