मुंबई इंडियन्सचा राजा..! रोहित शर्माची आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी राहिली कामगिरी

आयपीएल आणि रोहित शर्मा हे एक वेगळंच समीकरण आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला तारेच फिरले. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं. पण आता मुंबई इंडियन्समध्ये तो एक खेळाडू म्हणून असणार आहे. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दिवर एक नजर टाकूयात

मुंबई इंडियन्सचा राजा..! रोहित शर्माची आतापर्यंत आयपीएलमध्ये अशी राहिली कामगिरी
आला रे आला...! रोहित शर्माचा आयपीएलमध्ये आतापर्यंत असा राहिला प्रवास
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 3:12 PM

मुंबई : रोहित शर्मा हे आयपीएलमधलं मोठं नाव आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माने अनेक विक्रम रचले. आयपीएलमध्ये रोहित शर्माने 2008 मझ्ये डेक्कन चार्जर्सपासून सुरुवात केली. मात्र मुंबई इंडियन्सची कास धरताच त्याला खऱ्या अर्थाने नावलौकिक मिळाला. त्याने आपल्या नेतृत्व गुणाने मुंबई इंडियन्सचा कायापालट केला. आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याला वर्षाकाठी 3 कोटींची रक्कम मिळत होती. पण 2011 साली झालेल्या आयपीएल लिलावात रोहित शर्माचं नशिब पालटलं. मुंबई इंडियन्सने त्याला 9.20 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर 2013 साली त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं आणि पहिल्याच फटक्यात त्याने जेतेपद मिळवून दिलं. रोहित शर्माच्या नेतृत्वात 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली जेतेपद मिळवलं.

  • 2008 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 13 सामन्यात 36.72 च्या सरासरीने 404 धावा केल्या.
  • 2009 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 16 सामन्यात 27.84 च्या सरासरीने 362 धावा केल्या.
  • 2010 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 16 सामन्यात 28.85 च्या सरासरीने 404 धावा केल्या.
  • 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 33.81 च्या सरासरीने 372 धावा केल्या.
  • 2012 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 17 सामन्यात 30.92 च्या सरासरीने 433 धावा केल्या.
  • 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 19 सामन्यात 38.42 च्या सरासरीने 538 धावा केल्या.
  • 2014 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 15 सामन्यात 30.00 च्या सरासरीने 390 धावा केल्या.
  • 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 34.42 च्या सरासरीने 482 धावा केल्या.
  • 2016 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 14 सामन्यात 44.45 च्या सरासरीने 489 धावा केल्या.
  • 2017 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 17 सामन्यात 23.78 च्या सरासरीने 333 धावा केल्या.
  • 2018 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 14 सामन्यात 23.83 च्या सरासरीने 286 धावा केल्या.
  • 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 15 सामन्यात 28.92 च्या सरासरीने 405 धावा केल्या.
  • 2020 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 12 सामन्यात 27.66 च्या सरासरीने 332 धावा केल्या.
  • 2021 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 13 सामन्यात 29.30 च्या सरासरीने 381 धावा केल्या.
  • 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 14 सामन्यात 19.14 च्या सरासरीने 268 धावा केल्या.
  • 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 16 सामन्यात 20.75 च्या सरासरीने 332 धावा केल्या.

रोहित शर्माला 2008 ते 2011 साली डेक्कन चार्जर्सकडून खेळताना प्रत्येक वर्षी 3 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर 2011 साली मुंबई इंडियन्समध्ये आला आणि त्याला 9.20 कोटी रुपये मिळाले. 2013 सालापर्यंत त्याला 9.20 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर 2014 पासून 2017 पर्यंत त्याला 12.50 कोटी रुपयांची रक्कम दरवर्षी मिळाली. 2018 त्याच्या रक्कमेत वाढ होऊ 15 कोटी झाली आणि 2021 पर्यंत त्याला ही रक्कम दरवर्षी मिळाली. त्यानंतर 2022 मध्ये ही रक्कम एक कोटींना वाढवण्यात आली आणि 16 कोटी रुपये दरवर्षी अशी झाली.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.