IPL 2021 : मुंबईच्या तळपत्या ‘सूर्या’चा विराटसेनेला धोका, सलामीच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध मोठी खेळी?

9 एप्रिल रोजी आयपीएलच्या 14 व्या पर्वातील समालीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात खेळविली जाणार आहे.

IPL 2021 : मुंबईच्या तळपत्या 'सूर्या'चा विराटसेनेला धोका, सलामीच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध मोठी खेळी?
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 5:00 PM

चेन्नई :  आयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही तास उरले आहेत. उद्या म्हणजेच 9 एप्रिल रोजी आयपीएलच्या 14 व्या पर्वातील समालीची लढत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात खेळविली जाणार आहे. या सलामीच्या सामन्यात मुंबईचा तळपता सूर्यकुमार यादवपासून (Suryakumar Yadav) विराटसेनेला धोका आहे. उद्याच्या सामन्यात तुफान फॉर्मात असलेला सूर्यकुमार आरसीबीच्या बोलर्सच्या चिंधड्या उडवण्याची शक्यता आहे. कारण बंगळुरुविरुद्धची त्याची आकडेवारी पाहिली असता तो मोठी खेळी उभारणार, हे नक्की मानलं जात आहे. (Mumbai Indians Suryakumar yadav Virat kohli Opening Match IPL 2021)

सूर्यकुमार विराटसेनेसाठी धोका बनण्याचं कारण नंबर 1

सूर्यकुमारने 2020 च्या हंगामामध्ये आयपीएलमध्ये शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध अबू धाबी येथे खेळला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने43 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.

सूर्यकुमार विराटसेनेसाठी धोका बनण्याचं कारण नंबर 2

आयपीएल 2021 चा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. हे तेच मैदान आहे जिथे सूर्यकुमारने शेवटच्या मॅचमध्ये खेळताना बॅटिंगने कहर केला होता. आयपीएल 2019 च्या क्वालिफायर 1 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 54 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. त्याच्या खेळीने मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभवाचा धक्का दिला होता.

सूर्यकुमार विराटसेनेसाठी धोका बनण्याचं कारण नंबर 3

आयपीएल स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्याअगोदर सूर्यकुमार प्रचंड फॉर्मात आहे. नेटमध्ये तो कसून सराव करतो आहे. मुंबई वेळोवेळी त्याच्या बॅटिंगचे व्हिडीओ ट्विट करत आहे. एकंदरितच तो या व्हिडीओमधून मोठे शॉट्स खेळताना दिसून येत आहे.

तसंच इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत त्याने आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवलाय. त्याने केलेल्या खेळीने त्याने दिग्गजांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलीय.

(Mumbai Indians Suryakumar yadav Virat kohli Opening Match IPL 2021)

हे ही वाचा :

आफ्रिकेच्या खेळाडूंनी IPLसाठी पाकिस्तानविरुद्धची मालिका अर्धवट सोडली, शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणतो…

IPL 2021 : आरसीबीसाठी धोक्याची घंटा, एकाच ओव्हरमध्ये 6 षटकार मारणारा पोलार्डचा पुन्हा धुमाकूळ, मुंबईकडून Video शेअर

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा स्विमिंगपूलमधला हॉट अवतार, चाहते म्हणतात, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती!’

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.