मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? रोहितच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!
आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सुरुवातीचे काही सामने गमावल्यानंतर जोरदार कमबॅक केलं आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पण रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून शेवटचा खेळताना दिसेल, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई : आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. सर्वाधिक चषक जिंकण्याचा मान मुंबईच्या नावावर आहे. यंदाही सुरुवातीचे काही सामने गमवल्यानंतर मुंबईने कमबॅक करत तिसरं स्थान गाठलं आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने पडलेलं एक पाऊल टाकलं आहे. उर्वरित तीन पैकी दोन सामने जिंकले की प्लेऑफमधलं स्थान निश्चित होणार आहे. फलंदाजीत भक्कम असलेल्या मुंबईने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा 200 हून अधिक धावा चेस केल्या आहेत. पण असं असलं तरी कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म कळीचा मुद्दा ठरला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएल इतिहासात नकोसा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर या स्पर्धेत त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 11 सामन्यात 17.3 च्या सरासरीने 191 धावा केल्या आहेत. पण मागच्या पाच आयपीएल स्पर्धेत 400 हून अधिक धावा करणंही त्याला जमलं नाही.
रोहित शर्माचा फॉर्म पाहता काही माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली आहे. इतकंच काय त्याला आराम देण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स पुढच्या हंगामात रोहित शर्माला रिलीज करण्याची करण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माचा फॉर्म
रोहित शर्मा फलंदाजी पाहता त्याला रिलीज करण्याची शक्यता आहे. मागच्या पाच सामन्यात रोहितने 7,0,0,3 आणि 2 अशा धावा केल्या आहेत. त्याच्या अशा खेळीमुळे मिडल ऑर्डरमधील फलंदाजांवर ताण येतो. रोहितने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एक अर्धशतक ठोकलं आहे. 2022 आयपीएलमध्येही रोहित फ्लॉप ठरला होता. त्याने 19.1 च्या सरासरीने 14 सामन्यात 268 धावा केल्या होत्या. रोहितने 2018 मध्ये आरसीबी विरुद्ध 94 धावांची खेळी केली होती.
रोहित शर्माला 16 कोटी रुपयांना फ्री करणार?
2011 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला सहभागी केले होते. हार्ड हिटिंग बॅटर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. फ्रँचायझीने आयपीएल 2011 च्या लिलावात ₹13 कोटींमध्ये घेतलं होतं.त्यानंतर 2013 आणि 2018 मध्ये त्याला अनुक्रमे 12.5 कोटी आणि 15 कोटींमध्ये कायम ठेवले होते. 2022 पासून रोहित शर्माला 16 कोटी रुपये वार्षिक मिळतात.
रोहित शर्मा संघात सहभागी झाला तेव्हा त्याने चांगली भूमिका बजावली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात मुंबईने 5 आयपीएल जेतेपद जिंकले आहेत. पण त्याचा सध्याचा फॉर्म त्याला रिलीज करणंचा निर्णय घेतला जाऊ शकतो. व्यवसायिक दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सकडे आधीच कॅमरुन ग्रीन 17.50 कोटी, इशान किशन 15.25 कोटी आणि जसप्रीत बुमराह 12 कोटी मानधन घेत आहेत. रोहितला फ्री केल्यानंतर 16 कोटी योग्य खेळाडूंसाठी वापरता येतील.
मुंबई नवोदीत खेळाडूंना संधी देणार
मुंबई इंडियन्स नवोदीत खेळाडूंना संघात स्थान देण्याची शक्यता आहे. डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रतिभावंत खेळाडू आहे. मुंबईने हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, नितीश राणा आणि राहुल चहर सारख्या खेळाडूंना ओळख दिली आहे.
युजवेंद्र चहल, निकोलस पूरन, जितेश शर्मा आणि जोश हेझलवूडसारख्या खेळाडूंची मुंबईने पारख केली आहे. 2022 च्या लिलावात तिलक वर्मा, नेहल वढेरा आणि डेवाल्ड ब्रेविस यांना संघात घेतलं आहे.
मुंबई इंडियन्सने सर्वात महागडा खेळाडू म्हणून कॅमरून ग्रीनला संघात घेतलं आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे. रोहित शर्मा 36 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला पुढच्या सिझनपर्यंत रिलीज करण्याची शक्यता आहे. तर कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे.