DC vs MI IPL 2023 : IPL 2023 मध्ये टीम इंडियाला एक खतरनाक फिनिशर मिळालाय. टीम इंडिया अशा फिनिशरच्या शोधात होती. टी 20, टेस्ट किंवा वनडे क्रिकेट असो, तिथे हा खेळाडू आक्रमक बॅटिंग करतो. टीम इंडियाचा हा खेळाडू मैदानावर पाऊल ठेवताच आपल्या तुफानी बॅटिंगच्या बळावर टीमला हरलेला सामना जिंकून देतो. दिवसेंदिवस खेळाडू म्हणून त्याच्यामध्ये प्रचंड सुधारणा होत आहे. टीम इंडियासाठी हा खेळाडू भविष्यात खूप महत्वाचा ठरणार आहे.
काल दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये सामना झाला. आयपीएलच्या 16 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने आपला पहिला विजय मिळवला. दिल्ली विरुद्ध मुंबई मॅचमध्ये भले मुंबईची टीम जिंकली असेल, पण भविष्यात फायदा टीम इंडियाचा आहे.
टीम इंडियाला मिळाला एक चांगला फिनिशर
IPL 2023 मध्ये टीम इंडियाला नंबर 7 च्या पोजिशनवर मिळणारा खतरनाक फिनिशर दुसरा कोणी नाही, तर अक्षर पटेल आहे. अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला एक चांगला फिनिशर मिळालाय. मिशन वर्ल्ड कप 2023 आधी बिग सिक्स हिटर म्हणून अक्षरची ओळख निर्माण होणं, ही टीम इंडियासाठी चांगली बाब आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध अक्षर पटेल सातव्या नंबरवर फलंदाजीसाठी आला होता.
जाडेजापेक्षा पण खतरनाक
त्याने फक्त 25 चेंडूत 54 धावा फटकावल्या. अक्षरने त्याच्या इनिंगमध्ये 4 चौकार आणि 5 सिक्स मारले. मागच्या काही महिन्यात अक्षर पटेल रविंद्र जाडेजापेक्षा खतरनाक बॅटिंग करतोय. त्याशिवाय तो उपयुक्त फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो.
विकेट टू विकेट बॉलिंग
भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यावेळी अक्षर पटेल टीम इंडियासाठी घातक अस्त्र ठरु शकतो. अक्षर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. 7 महिन्यानंतर होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीमला चॅम्पियन बनवण्यात त्याची भूमिका महत्वाची असेल.
टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये अक्षर पटेलने टीम इंडियाच्या विजयात महत्वाच योगदान दिलय. अक्षरच्या गोलंदाजीच वैशिष्ट्य म्हणजे तो वेगाने आपली ओव्हर संपवतो. विकेट टू विकेट बॉलिंग करुन बॅट्समनला धावा करण्याची फार संधी देत नाही.