Mi vs RR : मुंबई इंडिअन्सला एकट्या पोराने धूतलं, जिंकण्यासाठी ‘इतक्या’ धावांचं आव्हान

मुंबईच्या गोलंदाजांचा आजही फ्लॉप शो पाहायला मिळाला. युवा यशस्वी जयस्वालने ठोक ठोक ठोकलं, शतक करत रचला इतिहास.

Mi vs RR : मुंबई इंडिअन्सला एकट्या पोराने धूतलं, जिंकण्यासाठी 'इतक्या' धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 10:19 PM

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल्सने 212 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 124 धावा केल्या. मात्र त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आलं नाही. जोस बटलरने 18 धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ संजू सॅमसन (14 धावा) आणि जेसन होल्डर (11 धावा) करून बाद झाले. मुंबईकडून अर्शद खानने 3 आणि पियुष चावलाने 2 बळी घेतले. जोफ्रा आर्चर आणि रिले मेरेडिथ यांनी 1 विकेट मिळवली.

यशस्वी जयस्वालने 62 बॉलमध्ये 124 धावांची धुंवाधार खेळी केली आहे. मुंबईच्या एकाही बॉलरला त्याने सोडलं नाही. जोफ्रा आर्चर यालाही त्याने कडक सिक्सर मारत पिसलंय. सनरायझर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूक आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यर या दोघांनी शतके केली आहेत. जयस्वालच्या शतकी खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या 200 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्ससमोर ठेवलं आहे. मुंबईची गोलंदाजी आजची ढेपाळलेली दिसली,  यशस्वी जयस्वालने आपल्या तडाखेबंद खेळीमध्ये सर्वच गोलंदाजांनी चीत केलं. मुंबईला स्पर्धेतील स्थान पक्क करण्यासाठी दोन गुण मिळवणं गरजेचं आहे. त्यासोबतच कर्णधार रोहित शर्माचा वाढदिवस असल्याने संघातील खेळाडू सामना जिंकून देत त्याला  गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रिले मेरेडिथ, अर्शद खान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.