मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास या टेबलमध्ये पहिल्या स्थानी गुजरात टायटन्स हा नवा संघ आहे. तर दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने एकूण 8 सामने खेळले असून त्या सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये राजस्थान संघ विजयी झालाय. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान रॉयल्सचा नेट रेट 0.561 आहे. तर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानला 12 पॉईंट्स मिळाले आहेत. दुसरीकडे या मोसमात मुंबई इंडियन्सचा संघ खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. पाच वेळचा चॅम्पियन संघ अजूनपर्यंत एकही मॅच जिंकू शकलेला नाही. सलग 8 सामन्यात पराभव झाला आहे. यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या या कामगिरीनंतर एक मोठा निर्णय घेतलाय. आता धवल कुलकर्णी हा मुंबई इंडियन्सच्या स्क्वाडमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघासाठी सगळ्यांचे प्रयत्न गरजेचे आहेत. तर रोहित शर्मा आणि इशान किशन यांना चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे. किशनने आठ सामन्यात 199 धावा केल्या आहेत. मुंबई संघातील प्रत्येक खेळाडूकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. आजचा सामना जिंकल्यास विजयाकडे त्यांची ही पहिली कूच समजली जाईल. मुंबई इंडियन्सच्या संघाबद्दल बोलायचं झाल्यास केरॉन पोलार्ड देखील पहिल्यासारखा फिनिशर राहिलेला नाही. जसप्रीत जरी चांगली कामगिरी करत असला तरी त्याला जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स आणि रिले मेरेडिथ यांच्या पाठिंब्याची गरज आहे.
राजस्थानने एकूण 8 सामने खेळले असून त्या सामन्यांपैकी सहा सामन्यांमध्ये राजस्थान संघ विजयी झालाय. तर दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. राजस्थान रॉयल्सचा नेट रेट 0.561 आहे. तर पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थानला 12 पॉईंट्स मिळाले आहेत. राजस्थानने बंगळुरू विरुद्ध शेवट्या सामन्यात 144 धावा काढल्या होत्या. रॉयल्सला त्यांच्या फलंदाजांकडून सुधारणेची आशा होती. विशेष म्हणजे त्यावेळी पडिक्कल आणि बटलर यांनी चांगल्या धावा केल्या होत्या. बटलरने आधीच तीन शतके झळकावली आहेत. पडिक्कल आक्रमक सुरुवात करेल. कर्णधार संजू सॅमसन आणि शिसमरॉन हेटिमर यांच्याकडे मुंबईला परतवून लावण्याचे काही खेळ्या आहेत. त्यामुळे यांचे मुंबई इंडियन्ससमोर आव्हान असणार आहे.