Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, GT vs MI, Orange cap : मुंबई इंडियन्सचा गुजरातवर विजय, ऑरेंज कॅपचे टॉप फाईव्ह स्पर्धक जाणून घ्या

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय, पाहुया...

IPL 2022, GT vs MI, Orange cap : मुंबई इंडियन्सचा गुजरातवर विजय, ऑरेंज कॅपचे टॉप फाईव्ह स्पर्धक जाणून घ्या
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायमImage Credit source: rr twitter
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 10:01 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये कालच्या सामन्यात  मुंबई इंडियन्सने (MI) गुजरात टायटन्सचा (GT) पाच धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावाच करू शकला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी नऊ धावांची गरज होती. मात्र, संघाला केवळ तीन धावा करता आल्या. शेवटच्या षटकात डॅनियल सॅम्सने अप्रतिम गोलंदाजी केली. तर त्याच्यासमोर डेव्हिड मिलर आणि राहुल टिओटिया होते. 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर एकही रन नाही. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानं तेवातिया धावबाद झाला. राशिद खाननं चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सॅम्सने मिलरला एकही धाव काढू दिली नाही. अशा प्रकारे मुंबई जिंकली. गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरातसाठी हा पराभव आश्चर्यचकित करणारा ठरलाय. कारण 12व्या षटकापर्यंत संघाने 106 धावांत एकही विकेट गमावली नव्हती. त्यानंतर संघाची दमछाक झाली. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय, पाहुया…

ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल

कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपचा पॉईंट्स टेबल बघितल्यास जॉस बटलरचं ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पहिलं स्थान कायम आहे. जोस बटलर पहिल्या स्थानी असून त्याने आतापर्यंत 588 धावा काढल्या आहे. केएल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर असून 451 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनने आगेकूच केली आहे. त्याने 369 धावा काढल्या आहेत. दरम्यान, चौथ्या स्थानात बदल झालाय. डेव्हिड वॉर्नर चौथ्या स्थानी आहे. त्याने 356 धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या असून त्याने 333 धावा काढल्या आहेत.

ऑरेंज कॅपचा टेबल

फलंदाज धावा
जोस बटलर718
केएल राहुल 537
डी कॉक502
शिखर धवन460
हार्दिक पांड्या453

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

साहा आणि शुभमनची अर्धशतके

12 षटकांनंतर गुजरात टायटन्सने एकही विकेट न गमावता 106 धावा केल्या. मुंबईचे गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले आहेत. असं दिसताच त्याचवेळी गुजरातचे सलामीवीर रिद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत अर्धशतके झळकावली. साहाच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक होते. त्याचबरोबर या मोसमात त्याने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली आहेत. शुभमनने आयपीएल कारकिर्दीतील तेरावे अर्धशतक झळकावले आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.