Musheer Khan याचा रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतकी धमाका
Musheer Khan Century | मुशीर खान याने वयाच्या 19 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम फेरीत विदर्भ विरुद्ध दमदार शतक ठोकलंय.
मुंबई | टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपला धमाका कायम ठेवलाय. मुशीरने क्वार्टर फायनलमध्ये बीकेसीत द्विशतक ठोकलं होतं. त्यानंतर मुशीरने सेमी फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर आता मुशीरने आणखी एक कारनामा केला आहे. मुशीरने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये विदर्भ विरुद्ध दमदार शतक ठोकलंय.
यश ठाकुर मुंबईच्या दुसऱ्या डावातील 91 वी ओव्हर टाकायला आला. मुशीरने या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर फटका मारुन 2 धावा घेत शतक पूर्ण केलं. मुशीरने 39.2 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावलं. मुशीरच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे दुसरं शतक ठरलं. स्टेडियममधील क्रिकेट चाहत्यांनी मुशीरच्या शतकानंतर उभं राहून त्याचं अभिनंदन केलं. बीसीसीआयने मुशीर खान याच्या शतकी खेळीनंतरच्या जल्लोषाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुशीर खानचं शतक
Century for Musheer Khan 💯👏
A gritty knock from the youngster under pressure 💪#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/bnu7C87qZP
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 12, 2024
दरम्यान त्याआधी मुशीर खान याने विदर्भ विरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल्या दुसऱ्या दिवशी अर्धशतक झळकावलं होतं. मुशीरने 132 बॉलमध्ये 38.6 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. मुशीरच्या या अर्धशतकी खेळीत 3 चौकारांचा समावेश होता. मुशीरच्या अर्धशतकानंतर त्याचे वडील नौशाद खान यांनी त्याचं अभिनंदन केलं. मुशीरने याआधी क्वार्टर फायनमध्ये बडोदा विरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. मुशीरने 203 धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर मुशीरने सेमी फायनलमध्ये तामिळनाडू विरुद्ध 55 धावांची खेळी केली. मुशीरने या खेळीसह आपली छाप सोडली.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.