Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांचा उदारपणा; थकबाकी वसूल न करता IPL सामन्यांना कडेकोट सुरक्षा

वारंवार पत्रव्यवहार करुनही मुंबई पोलीस (Mumbai Police) थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे.

मुंबई पोलिसांचा उदारपणा; थकबाकी वसूल न करता IPL सामन्यांना कडेकोट सुरक्षा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 3:11 PM

मुंबई : वारंवार पत्रव्यवहार करुनही मुंबई पोलीस (Mumbai Police) थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकवले असून पोलिसांच्या 35 स्मरणपत्रांना एमसीएने केराची टोपली दाखवली आहे. थकबाकी वसूल न करता आयपीएल क्रिकेट सामन्यांना (IPL Matches) सुरक्षा देत मुंबई पोलिसांने उदारपणा दाखवला आहे. मुंबई पोलीस मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले 14.82 कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे.

IPL, T-20 वर्ल्ड कप, महिला विश्वचषकाच्या आयोजनाचे पैसे थकीत

मुंबई पोलिसांनी गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष 2016 ची टी-20 विश्वचषक स्पर्धा, वर्ष 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल स्पर्धा आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

गृह खात्याचं दुर्लक्ष

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यांसाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले नाही. कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही, असे गलगली यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवून मागणी केली आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 14.82 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होइपर्यंत कुठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

इतर बातम्या

Rajasthan Royals Controversy: IPL सुरु व्हायच्या 24 तास आधी पहिला राडा, RR मध्ये आपसातच वाजलं, संजू सॅमसन का भडकला?

PAK vs AUS Test: Pat Cummins च्या ‘या’ क्लासिक यॉर्करसमोर बिचाऱ्या मोहम्मद रिझवानचा तरी कसा निभाव लागेल? पहा VIDEO

IPL 2022 Mumbai Indians चा संघ सरस वाटतो, पण एका विभागात नक्की गडबडणार

राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...