Ranji Trophy : मेघालयविरुद्ध ‘करो या मरो’ सामना, कॅप्टन अजिंक्य रहाणे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला घेणार?
Mumbai vs Meghalaya Ranji Trophy : मेघालयविरुद्धच्या सामन्यासाठी रोहित, यशस्वी, श्रेयस आणि शिवम दुबे हे अनुभवी खेळाडू उपलब्ध नाहीत. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणे मुंबईच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी देणार?
![Ranji Trophy : मेघालयविरुद्ध 'करो या मरो' सामना, कॅप्टन अजिंक्य रहाणे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला घेणार? Ranji Trophy : मेघालयविरुद्ध 'करो या मरो' सामना, कॅप्टन अजिंक्य रहाणे प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला घेणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mumbai-huddle-talk.jpg?w=1280)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दबदबा असणार्या मुंबईला रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू-काश्मीरकडून 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता मुंबई या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईला पुढील फेरीत पोहचण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. मुंबई विरुद्ध मेघालय यांच्यात 30 जानेवारीपासून बीकेसीतील शरद पवार अकादमी येथे हा सामना होणार आहे. या सामन्यात जम्मू-काश्मीर विरुद्ध खेळलेल्या काही खेळाडू नसतील. त्यामुळे कॅप्टन अजिंक्य रहाणे या आर या पार च्या लढाईसाठी कुणाला प्लेइंग ईलेव्हवनध्ये संधी देतो? याकडे मुंबईकर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
जम्मू काश्मीरविरुद्ध रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे 4 कॅप्ड खेळाडू खेळले होते. मात्र हे मेघालयविरुद्ध खेळणार नाहीत. रोहित, यशस्वी आणि श्रेयस हे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी सराव शिबिरात सहभागी होणार आहेत. तर शिवम दुबे याचा इंग्लंडविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे चौघे उपलब्ध नाहीत. आता या चौघांच्या अनुपस्थितीत कुणाला संधी मिळणार? हा प्रश्न साहजिक आहे.
एमसीए निवड समितीने मेघालयविरुद्धच्या सामन्यासाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाला पुढील फेरीत पोहचण्यासाठी मेघालयविरुद्ध जिंकावं लागणार आहे. त्यामुळे कॅप्टन रहाणे टीममध्ये कुणाचा समावेश करतो? कोणत्या 5 खेळाडूंना डच्चू मिळू शकतो? जाणून घेऊयात.
रोहित-यशस्वी यांच्यानंतर पुन्हा एकदा अंगकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे ही जोडी ओपनिंग करु शकते. सिद्धेश लाड तिसऱ्या, कॅप्टन रहाणे चौथ्या आणि सूर्यांश शेडगे पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. विकेटकीपर आकाश आनंद सहाव्या स्थानी येऊ शकतो. तर शार्दूल ठाकुर सातव्या क्रमांकावर येऊ शकतो. शार्दूलने गेल्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक केलं होतं.
बॉलिंग ऑर्डर
शार्दुल ऑलराउंडर आहे. शार्दुल बॅटिंगसह बॉलिंगनेही योगदान देतो. त्यामुळे शार्दूलला रॉयस्टन डायस, मोहित अवस्थी आणि अर्थव अंकोलेकर यांची साथ मिळू शकते. तसेच फिरकी बॉलिंगची जबाबदारी शम्स मुलानीवर असेल.
मेघालय विरूद्धच्या सामन्यासाठी मुंबईची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, आकाश आनंद (विकेटकीपर), शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, रॉयस्टन डायस, मोहित अवस्थी आणि अथर्व अंकोलेकर.