Video : मुनव्वर फारूकी याने घेतली सचिन तेंडुलकरची विकेट; स्टेडियममध्ये भयाण शांतता, व्हिडीओ तुफान व्हायरल

Munawar Faruqui Out Sachin Tendulkar watch Video : बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकी याने क्रिकेटच्या देवाला आऊट केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असलेला पाहायला मिळाला आहे.

Video : मुनव्वर फारूकी याने घेतली सचिन तेंडुलकरची विकेट; स्टेडियममध्ये भयाण शांतता, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 10:50 PM

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकीने आऊट केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सर्वात आधी चाहत्यांना प्रश्न पडला की काही वाचायला चुकलं का? कारण क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सचिनला आता दहा पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. दुसरं म्हणजे फारूकीने सचिन याची विकेट घेण्याचा जवळ-जवळ काय संबंध? मात्र हे घडलंय. मुनव्वरने क्रिकेटच्या देवाची विकेट घेतली आहे. नेमकी कोणत्या मैदानात आणि कशी जाणून घ्या सविस्तर.

पाहा व्हिडीओ-:

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या बुधवारी झालेल्या सामन्यात टीम मास्टर्स इलेव्हन वि. टीम खिलाडी इलेव्हन आमने सामने होते.  सचिन तेंडुलकर याने धडाकेबाज बॅटींग केली होती. अवघ्या 16 बॉलमध्ये 30 धावा केल्या होत्या. मुनव्वर फारूकी यालाही सचिनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅटची कट लागून कॅच उडाला, कीपरने हा कॅच पकडला आणि मुनव्वर याने सचिनची विकेट घेतली. त्यावेळी सर्व स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरलेली पाहायला मिळाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम मास्टर्स इलेव्हन संघाने 94-7 धावा केल्या. तर टीम खिलाडी इलेव्हन संघाला 89-6 धावाच करता आल्या. टीमच्या मालकांमध्ये करीना कपूर खान, सैफ अली खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा, अक्षय कुमार आणि इतर सेलिब्रिटी सहभागी झालेत.

दरम्यान, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. या लीगमध्ये सहा संघ सहभागी आहेत, 6 मार्च ते 15 मार्च दरम्यान ही स्पर्धा असणार आहे. सचिन तेंडुलकर ISPL 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. हे सामने टेनिस बॉलने खेळवले जात आहेत. फारूकी याने सचिनची विकेट घेतल्याने लीगही चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.