IND vs NZ | मुशीर खान याचं वर्ल्ड कपमध्ये दुसरं शतक, शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी
Musheer Khan Century | मुशीर खान याने या अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीत तडाखेदार कामगिरी केली. मुशीरने हाच तडाखा सुपर 6 मध्येही कायम ठेवला आहे.
मुंबई | सरफराज खान याची टीम इंडियात इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली. सरफराजला अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर संधी मिळाली. त्यामुळे सरफराजंच अभिनंदन करण्यात आलं. अशातच 24 तासांच्या आत खान कुटुंबियांना आणखी एक गूड न्यूज मिळाली आहे. सरफराज खान याचा छोटा भाऊ मुशीर खान याने धमाका केला आहे.मुशीर खान याने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मधील सुपर 6 मधील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं आहे. मुशीर खानचं हे या स्पर्धेतील दुसरं शतक ठरलं आहे. यासह मुशीर टीम इंडियासाठी या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मुशीरने यासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
शिखर धवनच्या विक्रमाची बरोबरी
मुशीरने 91.74 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. मुशीरने 109 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह हे शतक झळकावलं. मुशीर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन याच्यानंतर टीम इंडियासाठी 2 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मुशीरने याआधी साखळी फेरीत आयर्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं. मुशीरने आयर्लंड विरुद्ध 106 बॉलमध्ये 118 धावा केल्या होत्या.
दरम्यान मुशीर शतकानंतर आणखी आक्रमक झाला. मात्र त्याला अखेरपर्यंत नाबाद राहून तडाखेदार खेळी करता आली नाही. मुशीर 131 धावांवर आऊट झाला. मुशीरने 126 बॉलमध्ये 13 चौकार आणि 3 सिक्ससह 131 धावा केल्या. मुशीरने या धावा 103.97 च्या स्ट्राईक रेटने केल्या. मुशीरला मेसन क्लार्क याने झॅक कमिंग याच्या हाती कॅच आऊट केलं.
मुशीर खान याचं न्यूझीलंड विरुद्ध खणखणीत शतक
Second HUNDRED in the #U19WorldCup for Musheer Khan! 💯
He’s in supreme form with the bat 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/UdOH802Y4s#BoysInBlue | #INDvNZ pic.twitter.com/8cDG0b6iOx
— BCCI (@BCCI) January 30, 2024
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | ऑस्कर जॅक्सन (कॅप्टन), जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस आणि मेसन क्लार्क.
टीम इंडिया प्लेईग इलेव्हन | उदय सहारण (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी आणि सौम्य पांडे.