Ranji Trophy Final | अजिंक्यनंतर मुशीर खानचं शानदार अर्धशतक, मुंबई मजबूत स्थितीत
Musheer Khan Fifty | मुशीर खान याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपला दांडपट्टा सुरुच ठेवला आहे. मुशीरने कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्यानंतर अर्धशतक ठोकलंय. मुंबईच्या या दोघांनी अर्धशतक करत टीमला मजबूत स्थितीत पोहचवलंय.
मुंबई | कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्यानंतर आता मुशीर खान याने रणजी ट्रॉफी फायलनच्या दुसऱ्या दिवशी दमदार अर्धशतक ठोकलंय. या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे आणि शतकी भागीदारीमुळे मुंबई मजबूत स्थितीत पोहचली आहे. रहाणेने आधी अर्धशतक ठोकत टीकाकारांना चोख उत्तर दिलं. रहाणेनंतर मुशीरने काही षटकांनंतर अर्धशतक पूर्ण केलं. मुशीरच्या या खेळीनंतर मुंबईने 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली.
मुशीरने 132 बॉलमध्ये 38.6 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं. मुशीरचं हे फर्स्ट क्लास कारकीर्दीतील हे दुसरं अर्धशतक ठरलं. मुशीरच्या या अर्धशतकी खेळीत 3 चौकारांचा समावेश होता. मुशीरच्या अर्धशतकानंतर त्याचे वडील नौशाद खान यांनी त्याचं अभिनंदन केलं. मुशीर आणि नौशाद या दोघांचा आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुशीरच्या आधी कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 88 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्सह अर्धशतक पूर्ण केलं. अजिंक्यच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीतील हे 37 वं अर्धशतक ठरलं. रहाणेने 58 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलं.
मुशीरचं रणजी ट्रॉफी फायनलमध्ये अर्धशतक
Fifty and counting for young Musheer Khan 👏👏
Watch out for that celebration 😎
Follow the match ▶️ https://t.co/L6A9dXXPa2#RanjiTrophy | #MUMvVID | #Final | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/VNfOqMXZ0l
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 11, 2024
दरम्यान त्याआधी मुंबईने झटपट 2 विकेट्स गमावले. पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवाणी हे दोघे आऊट झाले. त्यामुळे मुंबईची 2 बाद 34 अशी स्थिती झाली. पृथ्वी शॉ 11 आणि भूपेन ललवाणी 18 धावा करुन आऊट झाले. विदर्भाकडून यश ठाकुर आणि हर्ष दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.