World Cup सेमी फायनलमध्ये हे चार संघ जाणार, श्रीलंकेला वगळत मुरलीधरन याची भविष्यवाणी!
मुरलीधरनने याने चार नाहीतर तीन संघांची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने श्रालंका संघाला तीनमध्ये जागा दिली नाही. मग नेमके कोणते तीन संघ आहेत जाणून घ्या.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 जसजसा जवळ येत आहे तसतसे आजी-माजी खेळाडू वर्ल्ड कपबाबत भविष्यवाणी करताना दिसत आहेत. अनेक खेळाडूंनी सेमी फायनमध्ये कोणते संघ जाणार त्याबाबत भाकीत वर्तवली आहेत. अशातच श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरन यानेही कोणते संघ सेमीफायनल गाठणार आहेत हे सांगितलं आहे. मात्र मुरलीधरनने याने चार नाहीतर तीन संघांची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने श्रालंका संघाला तीनमध्ये जागा दिली नाही. मग नेमके कोणते तीन संघ आहेत जाणून घ्या.
कोणते संघ आहेत?
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ सेमी फायनल फेरी गाठतील. मात्र चौथा संघ कोणताही असू शकतो. हे तीन संघ कन्फर्म सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील आणि चौथ्या संघाबाबत बोलायचं झालं तर क्रिकेट हा थोडासा नशिबाचा सुद्धा खेळ आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल न्युझीलंड आणि इंग्लंड मध्ये झालेल्या फायनल सामन्यात न्यूझीलंड संघ जिंकेल असं सर्वांना वाटत होतं मात्र इंग्लंड संघाने फायनल जिंकली होती, असं मुरलीधरन म्हणाला.
आशिया खंडातील संघांना यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये काही फायदा होईल का असा सवाल मुरलीधरन यासा विचारला. यावर बोलताना, स्पिनर्ससाठी जे विकेट मदत करेल त्या मैदानांवर आशिया खंडातील देशाच्या संघांना फिरकीची सवय असल्यामुळे त्याचा नक्की फायदा होईल, असं मुरलीधरन म्हणाला.
दरम्यान, मुरलीधरन याने आपल्या संघाचं नाव घेतलं नाही याचा अर्थ असा होतो की त्याला आपल्या संघावर फारसा काही विश्वास नाही. मात्र त्याने चौथा संघ सांगितला नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन यानेही भविष्यवाणी करत यंदाच्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड संघ प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे.