क्रिकेट चाहत्यासांठी मोठी बातमी, मुथय्या मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी

मुथय्या मुरलीधरनवर (Muttiah Muralitharan) चेन्नईतील अपोलो रुग्णालयात कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली. Muttiah Muralitharan coronary Angioplasty

क्रिकेट चाहत्यासांठी मोठी बातमी, मुथय्या मुरलीधरनवर अँजिओप्लास्टी
मुथय्या मुरलीधरन
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 1:39 PM

चेन्नई : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनवर (Muttiah Muralitharan) चेन्नईतील अपोलो रुग्णालयात कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात आली. मुथय्या मुरलीधरनच्या हृदयात स्टेंट टाकण्यात आला. मुरलीधरनवर रविवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयाशी संबंधित त्रास होत असल्यामुळे (Cardiac Issue) त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तो आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादसह (Sunrisers Hyderabad) चेन्नईमध्ये आहे. तो या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. (Muttiah Muralitharan will discharged today he underwent successful coronary Angioplasty with stents yesterday )

मुरलीधरनच्या हृदयात ब्लॉकेज

18 एप्रिल रोजी संध्याकाळी मुरलीधरनला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्या काही टेस्ट करण्यात आल्या. त्यांतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिपोटर्टनुसार मुरलीधरनच्या हृदयात ब्लॉकेज असल्याची माहिती मिळाली होती. मुरलीधरन 17 एप्रिलला चेन्नई येथे खेळवण्यात आलेल्या हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यावेळी मैदानात उपस्थित होता. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मुथय्या मुरलीधरनला आजचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

49 वर्षीय मुरलीधरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तो श्रीलंकेकडून 133 कसोटी आणि 350 एकदिवसीय सामने खेळला आहे. यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडेमध्ये 534 बळी घेतले आहेत. 2011 च्या विश्वचषकानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएलमध्येदेखील खेळला आहे.

हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक

मुरलीधरन चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांचा भाग होता. आयपीएलमध्ये तो 66 सामने खेळला आहे. त्यात त्याने 63 बळी घेतले आहेत. 11 धावा देत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या तीन मोसमात त्याने चेन्नई सुपर किंग्ज या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात त्याने 40 बळी मिळवले आहेत. त्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रशिक्षक म्हणून रुजू झाला आहे.

दिग्गज फिरकीपटू

बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे मुरलीधरनला आपल्या कारकीर्दीत बर्‍याचदा वादाचा सामना करावा लागला आहे. अनेकदा त्याची बॉलिंग अॅक्शन अवैध ठरवण्यात आली, परंतु प्रत्येक वेळी त्याला क्लीन चिट मिळाली. संपूर्ण कारकीर्दीत तो 1711 दिवस कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज राहीला आहे. कसोटी क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक काळ पहिल्या नंबरवर राहण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी, सर्वाधिक वेळा एकाच डावात पाच विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याच्याच नावावर आहे.

संबंधित बातम्या:

मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

IPL 2021: युजवेंद्र चहलने पहिली विकेट घेताच धनश्रीला अश्रू अनावर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

(Muttiah Muralitharan will discharged today he underwent successful coronary Angioplasty with stents yesterday )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.