‘त्या क्षणी माझ्या हृदयाची धडधड वाढलेली’; श्रेयस अय्यरने शेअर केला खास क्षण

श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाबाबत खास गोष्ट सांगितली. अय्यर म्हणाला, "मी खेळाडूंचा कर्णधार आहे. सर्व खेळाडू एकाच ध्येयाचा विचार करतील असे वातावरण मला निर्माण करायचे आहे. मी केकेआरमध्ये वेगळ्या मानसिकतेसह येत आहे कारण आता माझ्याकडे अधिक अनुभव आहे आणि माझ्याकडे पूर्वीपेक्षा चांगले नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याचे कौशल्य आहे.

'त्या क्षणी माझ्या हृदयाची धडधड वाढलेली'; श्रेयस अय्यरने शेअर केला खास क्षण
Shreyas IyerImage Credit source: Shreyas Iyer Facebook
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:12 PM

मुंबई : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकावली. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला. आक्रमकतेबरोबरच परिस्थिती ओळखून खेळण्याचं भानही श्रेयसच्या फलंदाजीत दिसून आलं. विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. दरम्यान, श्रेयसला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत धुमाकूळ घालणाऱ्या श्रेयस अय्यरची नजर आता आयपीएल 2022 च्या चषकावर आहे. श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सशी झालेल्या एका खास संभाषणात म्हणाला, आयपीएल 2022 जिंकण्यासाठी मी शक्य तितके प्रयत्न करेन. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) 16 फेब्रुवारीला श्रेयस अय्यरला कर्णधार बनवले होते. श्रेयस अय्यरला लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 12.5 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. कोलकात्याने या खेळाडूची केलेली निवड श्रेयसने नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेत सार्थ ठरवली. हा खेळाडू अप्रतिम फॉर्ममध्ये आहे तसेच त्याच्या कर्णधारपदाची चुणूक सर्वांनी याआधीच पाहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या गेल्या दोन वर्षांमधील यशात अय्यरचा मोठा वाटा आहे.

श्रेयस अय्यर केकेआरशी झालेल्या संवादादरम्यान म्हणाला, ‘मी मैदानात उतरायला तयार आहे. यावेळी मी केकेआरकडून खेळणार आहे. जेव्हाही मी या संघाविरुद्ध खेळलो तेव्हा चाहत्यांचं या संघावर किती प्रेम आहे ते मी पाहिलं आहे. यावेळी मी या संघाचा कर्णधार असेन आणि स्टेडियम आमचा उत्साह वाढवेल. मी जबाबदारीसाठी तयार आहे आणि मला चॅम्पियनशिप जिंकायची आहे.

त्या क्षणी माझ्या हृदयाची धडधड वाढलेली : अय्यर

श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधारपदाबाबत खास गोष्ट सांगितली. अय्यर म्हणाला, “मी खेळाडूंचा कर्णधार आहे. सर्व खेळाडू एकाच ध्येयाचा विचार करतील असे वातावरण मला निर्माण करायचे आहे. मी केकेआरमध्ये वेगळ्या मानसिकतेसह येत आहे कारण आता माझ्याकडे अधिक अनुभव आहे आणि माझ्याकडे पूर्वीपेक्षा चांगले नेतृत्वगुण आणि निर्णय घेण्याचे कौशल्य आहे. अय्यर म्हणाला की केकेआरने मला विकत घेतल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्या दिवशी लिलाव पाहत होतो. केकेआर फ्रँचायझी सुरुवातीपासूनच मला विकत घेण्यासाठी पुढे होती. आम्ही सर्व खेळाडू एकत्र बसून लिलाव पाहत होतो. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. केकेआरने मला विकत घेतल्याचा मला आनंद आहे.”

इतर बातम्या

IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.