Retirment : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी निवृत्तीची घोषणा, टीमला मोठा धक्का

Odi Cricket Retirement : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरुन गदारोळ सुरु असताना माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमधू निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे.

Retirment : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी निवृत्तीची घोषणा, टीमला मोठा धक्का
Rohit sharma and Mohammad Nabi
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 5:13 PM

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने  तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर मात करत मालिकाही जिंकली. त्यानंतर अफगाणिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार ऑलराउंडर मोहम्मद नबी याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर वनडे क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं नबीने सांगितलं. मी गेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेपासून निवृत्तीबाबत विचार करत असल्याचं नबीने तिसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट केलं.

अफगाणिस्तानने ही मालिका 2-1 ने जिंकली. नबीने या मालिकेतील तिन्ही सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. नबीला त्याच्या या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. नबीने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. माझ्या डोक्यात गेल्या वर्ल्ड कपपासूनच निवृत्तीचे विचार होते. मात्र आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलो. मी त्या स्पर्धेत खेळू शकलो तरं बरं होईल, असा विचार माझ्या डोक्यात आला”, असं मोहम्मद नबी याने म्हटलं.

अफगाणिस्तान भारतात पार पडलेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत सहाव्या स्थानी राहिली. अफगाणिस्तान यासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी थेट पात्र ठरली. या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

मोहम्मद नबीची कारकीर्द

मोहम्मद नबी याने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच नबीने काही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. मोहम्मद नबी याने 167 एकदिवसीय सामन्यांमधील 147 डावांमध्ये 2 शतकं आणि 17 अर्धशतकांसह 3 हजार 600 धावा केल्या आहेत. तसेच नबीने 161 डावांमध्ये 172 विकेट्सही घेतल्या आहेत.

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबादिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर आणि फजलहक फारुकी.

बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन : मेहदी हसन मिराझ (कॅप्टन), तन्झिद हसन, सौम्या सरकार, झाकीर हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, नाहिद राणा, शॉरीफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.