नव्या वर्षाची सुरुवात कर्णधारपद सोडून..! अचानक घेतलेल्या निर्णयामुळे चर्चांना उधाण
2025 या नववर्षाच्या सुरुवातीला क्रीडाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्णधारपदावरून वादंग सुरू असताना अचानक एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडाविश्वात या निर्णयाची चर्चा होत असून पुढे काय असा प्रश्न देशील उपस्थित होत आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पाचव्या कसोटीपूर्वी टीम इंडियात बरंच काही शिजताना दिसत आहे. रोहित शर्मा पाचव्या कसोटीत खेळणार की नाही? याबाबत चर्चा रंगल्या असताना दुसरीकडे बांग्लादेश संघातही अचानक घडामोडी घडल्या आहेत. नजमुल हुसैन शांतोने बांग्लादेश क्रिकेट संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. शांतोने टी20 संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. मिडिया रिपोर्टनुसार, खरत शांतो तिन्ही फॉर्मेटमधून कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत होता. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याला फक्त टी20 संघाचं कर्णधारपद सोडण्यासाठी कसं बसं तयार केलं. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, नजनुल आता टी20 संघाचा कर्णधार नसेल. पुढच्या काळात टी20 सीरिज नसल्याने नव्या कर्णधाराची घोषणा केली नाही. जर नजमुल फिट अँड फाईन राहिल तर कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार राहील. नजमुल टी20 वर्ल्डकप 2024 नंतरच कर्णधारपद सोडणार होता.
मिडिया रिपोर्टनुसार, नजमुलच्या जागी लिट्टन दास आात टी20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्याची शक्यता आहे. बीसीबी अधिकाऱ्यांनी लिट्टन दासचं अधिकृत नाव वगैरे जाहीर केलं नाही. पण त्याच्या नावावर मोहोर लागणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण लिट्टन दासच्या नेतृत्वात बांगलादेशने वेस्ट इंडिजला टी20 मालिकेत 3-0 ने पराभूत केलं होतं. दुसरीकडे, नजमुल हुसैन शांता चॅम्पियन्स ट्रॉफीत बांगलादेशचं कर्णधारपद भूषवणार आहे. यापू्र्वी मेहदी हसन वनडे संघाचा कर्णधार होईल अशी चर्चा होती. कारण तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेत संघाचा स्टँड इन कर्णधार होता. पण बीसीबीने शांतोच्या नावाची घोषणा केली आहे.
दुसरीकडे, टीम इंडियाच्या कर्णधारपदावरूनही वाद उफाळला आहे. रिपोर्टनुसार रोहित शर्मा सिडनी कसोटीनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर येऊ शकते. त्यामुळे रोहित शर्मा सिडनी कसोटी खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, गौतम गंभीरने इशाऱ्यात प्लेइंग इलेव्हनचं काही ठरलं नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.