Dhananjay Munde | ‘या’ स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Dhananjay Munde On Sharad Pawar Cricket Stadium | आमदार धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांकडे शरद पवार यांच स्टेडियमला नाव देण्याची मागणी केली आहे. नातू रोहित पवार आजोबांचं स्टेडियमला नाव देणार का?

Dhananjay Munde | 'या' स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 7:59 PM

मुंबई | क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. क्रिकेट चाहते प्रत्येक सामना हा आवर्जुन पाहतात. गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात टी 20 क्रिकेटला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे. आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ठिकाणी टी 20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एमपीएल 2023 अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेतील अंतिम सामना हा 29 जूनला पार पडणार आहे. अशा एकूण 15 दिवस ही स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

एमपीएलमधील सर्व सामन्यांचं आयोजन हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या एमपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना हा पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स यांच्यात पार पडला. या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

आता धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांना पत्राद्वारे मागणी केलीय. गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचं नाव देण्यात यावं, अशा मागणीचं पत्र धनंजय मुंडे यांनी लिहिलंय. धनंजय मुंडे यांनी हे पत्र आणि शरद पवार यांचा वानखेडे स्टेडियममधील फोटो ट्विट केलाय.

धनंजय मुंडे यांच्या पत्रात काय?

धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रातून रोहित पवार यांचे एमपीएल स्पर्धेचं आयोजन करुन युवा खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार मानलेत. त्यानंतर स्टेडियमला पवार साहेबांचं नाव देण्याची मागणीही केलीय. तसेच या पत्रात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या क्रिकेटमधील योगदानाचंही उल्लेख केलंय.

धनंजय मुंडे यांचं रोहित पवार यांना पत्र

आता धनंजय मुंडे यांच्या या मागणीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे महाराष्ट्रचं लक्ष असणार आहे.

दरम्यान आज शुक्रवारी एमपीएल क्रिकेट स्पर्धेतील पहिल्यावहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा इगल नाशिक टायटन्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स यांच्यात पार पडला. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.