Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : वूमन्स टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध भिडणार, सामना केव्हा?

U 19 W World Cup 2025 IND W vs ENG W Semi Final 2 Live Streaming : अंडर 19 वूमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत.

IND vs ENG : वूमन्स टीम इंडिया सेमी फायनलसाठी सज्ज, इंग्लंडविरुद्ध भिडणार, सामना केव्हा?
U 19 W World Cup 2025 IND W vs ENG W Semi Final 2
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 7:31 AM

अंडर 19 वूमन्स टीम इंडिया सलग दुसरा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात साखळी आणि त्यानंतर बाद फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत.

टीम इंडियाने साखळी फेरीतील 3 आणि सुपर 6 मधील दोन्ही असे एकूण 5 सामने जिंकलेत. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने साखळी फेरीत 2 सामन्यात विजय मिळवला. तर एका सामन्याचा निकालच लागू शकला नाही. तसेच इंग्लंडचा सुपर 6 मधील पहिला सामना रद्द करण्यात आला. तर इंग्लंडने दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. आता उपांत्य फेरीत कोणता तरी एक संघ जिंकून अंतिम फेरीत जाणार तर एका संघाचं आव्हान पराभवासह इथेच संपेल. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना शुक्रवारी 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना बायुमास ओव्हल, क्वालालंपूर येथे होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरुवात होईल. तर 11 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवरुन लाईव्ह मॅच पाहता येईल.

महिला ब्रिगेड सज्ज

अंडर 19 वूमन्स टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), गोंगडी त्रिशा, मिथिला विनोद, वैष्णवी शर्मा, जोशिता व्ही जे, जी कमलिनी, भाविका अहिरे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी शकील, आयुषी शुक्ला, धृती केसरी आणि आनंदिता किशोर आणि ईश्वरी अवसरे.

अंडर 19 वूमन्स इंग्लंड टीम : अबी नॉरग्रोव्ह (कर्णधार), फोबी ब्रेट, ऑलिव्हिया ब्रिन्सडेन, टिली कॉर्टीन-कोलमन, ट्रुडी जॉन्सन, केटी जोन्स, शार्लोट लॅम्बर्ट, इव्ह ओनिल, डेविना सारा टी पेरिन, जेमिमा स्पेन्स, शार्लोट स्टब्स, अमू सुरेनकुमा, प्रिशा थानावाला, एरिन थॉमास थॉम्पसन.

..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका
..याची माहिती CM यांना आहे का?, बीड हत्या प्रकरणावरून दमानियांची टीका.
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं
गोऱ्हेंना अंधारेंची कायदेशीर नोटीस, ठाकरेंबद्दलचं 'ते' भाष्य करण भोवलं.
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू
त्र्यंबकेश्वरमधील वादावर प्राजक्ता स्पष्ट म्हणाली, मनातले किंतू परंतू.
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप
देख तूनी बायको.. गाण्यावर थिरकले महसूलचे अधिकारी; वडेट्टीवारांचा संताप.
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'
धंगेकर पक्षप्रवेशावर स्पष्टच म्हणाले, 'निर्णय घ्यायचा की नाही ते...'.
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा
'..माझ्यावर दबाव होता', कोल्हेंचा 'स्वराज्यरक्षक संभाजी'बाबत मोठा दावा.
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी
'पण ब्राम्हणांची औकात...', इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी.
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?
गोऱ्हेंच्या वक्तव्यानं शिवसेनेत नाराजीचा सूर?आता पक्षाची भूमिका काय?.
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?
राऊतांचा फोटो थेट रेड्याच्या गळ्यात, शिवसेनेचं कुठं अनोखं आंदोलन?.
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.